पाषाण :
पाषाण तलावातील प्रदुषित पाण्यामुळे मागील काही दिवसांपासून शिवनगर, सुतारवाडी, सिद्धटेक सोसायटी, साई विहार, अनुषा रेसिडेन्सी, यश क्लासिक, माऊंटवर्ट ग्रँड आणि सुसरोडचा काही भाग या ठिकाणी दुर्गंधी वास पसरला होता. त्यामुळे स्थानिक लोकांना याचा खूप त्रास होत होता. .
तेथील स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आल्यामुळे त्यांची दखल घेत सचिन पाषाणकर स्विकृत नगरसेवक यांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त जयदीप पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सदर परिस्थिती गांभीर्य लक्षात घेऊन, आरोग्य विभाग व संबंधित विभागास त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
त्यावेळी महपालिका यंत्रणेचे अधिकारी एसआय निकम साहेब, सचिन पाषाणकर,चेअरमन राव काकू,मृदुला जोशी, देव साहेब यांच्या उपस्थित सदर परिसराची पाहणी केली. त्यावेळी प्रदूषित पाण्यामुळे जलपर्णी व त्या मध्ये मासे मेलेले आढळले. महानगरपालिकेच्या यंत्रणेने तात्काळ दखल घेतली. जलपर्णी काढायला सुरूवात केली आहे.
याबाबत पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष आरपीआय रोजगार आघाडी चे संतोष गायकवाड यांनी महापालिका सहायक आयुक्तांना जलपर्णी काढण्याबाबत निवेदन दिले, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस समीर उत्तरकर यांनी अधिकाऱ्यांना जलपर्णी भेट देऊन जलपर्णी लवकरात लवकर काढण्याची मागणी केली.