गोरगरिबांसाठी दिवाळी सरंजाम सारखे कार्यक्रम राबवणे महत्त्वाचे : रावसाहेब दानवे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या सरंजाम वाटप कार्यक्रमाप्रसंगी प्रतिपादन.

0
slider_4552

बालेवाडी :

नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने बाणेर बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या भागातील गोरगरीब नागरीकांसाठी दिवाळीनिमित्त सरंजाम वाटपाचा कार्यक्रम केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या वतीने प्रल्हाद सायकर यांच्या संकल्पनेतून बाणेर येथे उभारले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास २,५१,००० रूपये मदत म्हणून देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले की, दिवाळी सरंजाम ही केवळ नागरिकांची दिवाळी चांगली जावी म्हणून एक भेट आहे. त्यामागे कोणतीही अपेक्षा नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जर मी केले असेल, त्यांची कामे केली असेल तर निश्चितच नागरिकांचे आशीर्वाद मला भेटतील अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, पाच वर्ष अमोल बालवडकर यांनी नागरिकांची दिवाळी गोड करण्याचे काम केले आहे. त्यांनी नेहमीच अडी अडचणीत असणाऱ्या नागरिकांची सेवा केली आहे त्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. असेच पुढील पाच वर्षात देखील नगरसेवक म्हणून अमोल बालवडकर यांना दिवाळी सरांजामाच्या महत्वाचा कार्यक्रम करण्याची संधी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, कोरोना काळामध्ये नागरिकांना आर्थिक दुरवस्था निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचं काम अमोल बालवडकर करत आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, परभणी आमदार मेघना बोर्डीकर, परभणीचे भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनीदेखील अमोल बालवडकर यांच्या कामाचे कौतुक केले.

केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदिशजी मुळीक, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक किरण दगडे पाटील, प्रकाश बालवडकर, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, ज्ञानेश्वर तापकीर, लहु बालवडकर, राहुल कोकाटे, उमा गाडगिळ, अस्मिता करंदिकर, आशा बालवडकर, स्नेहल अमोल बालवडकर, प्रल्हाद सायकर, सुंदरशेठ बालवडकर, अनिल बालवडकर, हनुमंत बालवडकर, अनिल बाप्पु ससार, काळुराम गायकवाड, किरण तापकिर, राखी श्रीवास्तव, उज्वला साबळे, रिना सोमैया, स्मरणिका जुवेकर, अशोक बालवडकर, बबनराव चाकणकर, लक्ष्मणराव सायकर, अमर लोंढे, नामदेव गोलांडे, हनुमंत बालवडकर, अतुल आमले, अनंता चांदेरे, राजु पाडाळे पाटील, राजु पाषाणकर, रामदास विधाते, रामदास मुरकुटे, राजेश विधाते, गहिनीनाथ कळमकर, सुभाष भोळ, प्रविण जांभुळकर, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व सभासद तसेच अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.

See also  आरोग्य हीच संपत्ती' या तत्वावर आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणीवर भर : सुनील केदार