माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आकाशकंदील कार्यशाळा उत्साहात पार

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून लहान मुलांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला दिवाळीनिमित्त आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा त्यांनी संजय गांधी ग्राम संस्कृती उद्यान सोमेश्वर वाडी येथे आयोजित केली होती. लहान मुलांना स्वतः तयार केलेली वस्तू घरात लावली की त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. अशीच आकाश कंदील बनविण्याची संधी सनी निम्हण यांनी आपल्या संकल्पनेतून लहान मुलांना ऊपलब्ध करुण दिली.

या कार्यशाळेत शेकडो लहान मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या छोट्या छोट्या मुलांनी आकाश कंदील बनवताना आकाश कंदील आम्ही आमच्या घरी लावणार असे आनंदात सांगितले. थँक्यू सनी दादा असे गोड बोल सनी निम्हण यांच्या बद्दल या छोट्याशा सवंगड्यांनी काढले.

कार्यशाळेमध्ये जेव्हा ही मुले मोठ्या उत्साहात आकाशकंदील बनवत होती त्यावेळी होता सनी निम्हण त्यांच्यामध्ये सामील होऊन त्यांनी बनवलेल्या कलाकृतीला ते दाद देत होते. मुलेही मोठ्या उत्साहात आपण केलेला आकाश कंदील त्यांना दाखवत होते. सनी दादा माझा आकाश कंदील आम्ही असा केला आहे. आणि ते सुद्धा मोठया कौतुकाने आकाश कंदील पाहत होते.

मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून भावना व्यक्त करताना सनी निम्हण यांनी सांगितले की, मुलांचा उत्साह आणि कल्पकता थक्क करणारी होती. निरागसतेचा प्रकाश संकटाच्या काळोखावर किती सहजपणे मात करून जातो याचा अनुभव आला. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मुलांना आणि पालकांना मनस्वी धन्यवाद! ही दिवाळी आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटीची जावो, नकारात्मकतेचा काळोख सरो आणि नव्या संकल्पाच्या पूर्तीचा उजाळा मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा!

 

See also  पहा भारतीय जनता पक्षाचा विकासनामा - भाग 2. नगरसेवक अमोल बालवडकर.