बाणेर :
आज मा.महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे येथील कृत्रिम पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी व समस्या जाणुन घेण्यासाठी बालेवाडी येथे मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या मागणी नुसार प्रत्यक्ष पाहणी करुन नागरीकांशी व महापालिका पाणी पुरवठा अधिकार्यांशी चर्चा केली.




यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी अत्यंत गंभिर असलेल्या पाणी प्रश्नावर चर्चा केली. यावेळी नागरीकांनी चार चार दिवस मनपा कडुन कोणत्याच प्रकारचा पाणी पुरवठा बाणेर-बालेवाडी भागाला होत नसल्याने धरणात मुबलक प्रमाणात पाणी साठा असुन देखिल येथील नागरीकांना पाण्यापासुन वंचित रहावे लागत आहे असे आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिले. यावर तातडीने उपाय योजना करुन वारजे येथुन पाणी पुरवठा वाढविण्याचे तसेच बाणेर व बालेवाडी येथे तातडीने वाढीव पंप बसविण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना दिले. तसेच बालेवाडी येथील अंडर ग्राऊंड टाकीमध्ये पंप बसवुन बालेवाडी भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले.
तसेच २४x७ समान पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असुन येत्या १५ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उर्वरीत पाईप लाईनचे काम पुर्ण करणे, नविन टाक्यांना पंप बसवुन टाक्या कार्यरत कराव्या व त्यातुन या भागाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश देखिल मा. आयुक्तांनी अधिकार्यांना दिले.
यावेळी “बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे भागाला त्यांच्या हक्काचा मुबलक पाणी पुरवठा करुन येथील नागरीकांना व माता-भगिनींना लवकरात लवकर या कृत्रिम टंचाईतुन मुक्तता करावी” अशी मागणी मा.नगरसेवक अमोल बालवडकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली. तसेच या भागातील सर्व वॅाल्व्हची पुन्हा एकदा तपासणी करुन त्यांना योग्यरित्या हताळण्याची आवश्यकता असल्याचे देखिल सांगितले.
यावेळी “या भागाला निर्माण झालेली पाणी समस्या हि पुर्णपणे कृत्रिम असुन या भागातील सर्व वॅाल्वमन ला सक्तिची ताकिद देवुन सर्व वॅाल्व पुर्वरत करत या भागाला लवकरात लवकर पुन्हा एकदा सुरळित पाणी पुरवठा करण्याची मागणी” यावेळी गणेशजी कळमकर यांनी केली.
यावेळी मा.नगरसेवक अमोल बालवडकर, मा.नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, युवा नेते गणेश कळमकर, युवा नेते लहु बालवडकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, शशिकांत बालवडकर, संदिप बालवडकर, अस्मिता करंदिकर व परिसरातील सोसायटींचे नागरीक, ग्रामस्थ व पुणे मनपा पाणी पुरवठ्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.








