वारजे :
पैलवानांनी कुस्तीवर लक्ष द्यावे. कोणावरही अन्याय होणार नाही कुस्तीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये कुस्तीगीर संघ पुणे व तालीम संघ पुणे जिल्हा हे दोन्ही संघ प्रतिनिधित्व करतील. याबाबत, काही शंका असल्यास हिंदकेसरी अमोल बराटे व हिंदकेसरी अमोल बुचडे यांच्याशी संपर्क करावा. कुस्तीला उंचीवर घेऊन जाण्यासाठी आपले राष्ट्रीय अध्यक्ष याचे मोठे श्रेय आहे. अनेक पंच आणि कुस्तीपटूच्या मनात कारवाई होण्याची भीती आहे, मात्र कोणत्याही पंचावर किवा कुस्तीपटूवर कारवाई होणार नाही. प्रत्येक पंच आणि कुस्तीपटूला अध्यक्ष ओळखतात, त्यामुळे त्यांनी निश्चित राहावे. असे अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय कुमार सिंग सांगितले.




महाराष्ट्राच्या कुस्ती स्पर्धेमध्ये अस्थायी समितीच्या निर्णयामुळे यंदा कुस्तीगीर संघ पुणे व तालीम संघ पुणे जिल्हा हे संघ प्रतिनिधित्व करणार आहेत च्या संदर्भामध्ये वारजे येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली यावेळी अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय कुमार सिंग बोलत होते
वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या कुस्ती संकुलाची माहिती यावेळी माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी दिली यावेळी अस्थायी समितीचे अध्यक्ष संजय कुमार सिंग यांनी 12 प्रेक्षक बसू शकतील माती व मॅटवरील उभारण्यात येणाऱ्या संकुलाची कौतुक केले
यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष काका पवार, उपमहापौर दिलीप बराटे, विजय बराटे हिंदकेसरी अमोल बराटे, हिंदकेसरी अमोल बुचडे, बाबा बाणेकर माजी महापौर तात्या कदम, वस्ताद विजय जाधव श्रीरंग चव्हाण पाटील, गोरक्षनाथ भिकुले, प्राध्यापक राजू मते, वस्ताद विकास रानवडे, विश्वास मानकर, केदार कदम, महेश मोहोळ, सचिन घोटकुले, सागर गरुड, महेंद्र कुंजीर, शामराव यादव, संभाजी आंग्रे, मारुती आडकर, किसन बुचडे, प्रदीप भोसले, राजाराम कदम, राहुल वांजळे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र केसरीसाठी शहराचे नेतृत्व तुषार वरखडे, प्रतिक देशमुख करणार. पंच कमिटी – किसन बुचडे, प्रदीप भोसले, राजू मते, राजाभाऊ कदम, विठ्ठल मोहोळ, हनुमंत मणेर, पप्पू कालेकर, केशव बोत्रे, रवी बोत्रे, रामभाऊ जावळकर यांनी काम पाहिले.

निकालातील प्रथम क्रमांकाचा खेळाडूची महाराष्ट्र केसरीच्या संघात निवड झाली आहे.
शहर गादी विभाग –
वजन गट- प्रथम द्वितीय क्रमांक- विजेत्या खेळाडूचे नाव (कंसात तालमीचे नाव) ५७ किलो – दीपक पवार (आंतराष्ट्रीय), रोहन आहेरकर (गुलशे), ६१ किलो- कृष्णा हरणावळ (आंतराष्ट्रीय), प्रथमेश शिंदे (गुलशे),६५ किलो- विपुल थोरात (सह्याद्री), उदय धनगर (गुलशे), ७०किलो- संकेत ठाकूर (सह्याद्री), रामा घोरपडे (औध गाव),७४ किलो- कौस्तुभ बोराटे (मोहोळ), आकार कोकाटे (आंतराष्ट्रीय), ७९ किलो- स्वप्नील शिंदे (हनुमान), अक्षय चोरघे (मोहोळ), ८६ किलो- मयुर दगडे (आंतराष्ट्रीय), प्रसाद कडेल (गोकुळ), ९२ किलो- अनिकेत कंधारे (हनुमान), शशांक बारगुजे (गोकुळ), ९७ किलो- पृथ्वीराज खडके (आंतरराष्ट्रीय), सिद्धांत दबडे (मोहोळ), खुला गट – तुषार वरखडे (मोहोळ) श्रेयस कारले (आंतरराष्ट्रीय)
*कुस्तीगीर संघ पुणे शहर माती विभाग*
५७किलो- विशाल थोरवे (पवार), ऋतिक कोळेकर (मोहोळ), ६१किलो- सौरभ टकले (पवार), साहिल भोसले (महेश बँक), ६५किलो- अनुदान चव्हाण (पवार), पुष्कर निवंगुने (मोहोळ), ७०किलो- निखिल कदम (शिवरामदादा), रोहित ननावरे (हनुमान), ७४किलो- आशुतोष भोंडवे (हनुमान), कुणाल शिंदे (गोकुळ), ७९किलो- हेमंत माझीरे (कुंजीर), प्रतीक वर्पे (गोकुळ), ८६किलो- सागर शिंदे (गोकुळ), करण राजीवडे (हनुमान), ९२किलो- ओंकार शिरगिरे (मोहोळ), अभिजीत भोईर (मोहोळ), ९७ किलो- अथर्व चव्हाण (शिवरामदादा), लौकीक सुर्वे (हनुमान) महाराष्ट्र केसरी- प्रतिक देशमुख (सह्याद्री), जयेश सुर्वे (सुभेदार )
जिल्ह्यातून माती विभागात आकाश रानवडे गादी विभागातून मनीष रायने यांची निवड.
जिल्हा गादी विभाग– ५७ किलो- स्वप्नील शेलार (बारामती), गौरव जावळकर ( हवेली), ६१ किलो प्रतिक येवले, सनी केदारी ( दोघे ही मावळ), ६५ कि- केतन घारे (मावळ), प्रथमेश तावरे(बारामती), ७० कि आबा शेंडगे (शिरूर) मयुर जावळकर (हवेली),७४ किलो- निखिल वाघ (आंबेगाव), सुरज सातव(हवेली), ७९ किलो- अक्षय कामथे(पुरंदर), गणेश निंबाळकर (बारामती),८६ किलो – कुलदिप इंगळे(शिरूर), कार्तिक धावडे(हवेली), ९२ किलो – अभिजित शेंडे (इंदापूर),ओंकार शिंदे (वेल्हा), ९७ किलो-अभिषेक देवकाते(बारामती), प्रतिक कदम (इंदापूर), ८६ ते १२५ खुला गट महाराष्ट्र केसरी प्रथम- आकाश रानवडे (मुळशी) संग्राम बाबर (हवेली)
*जिल्हा माती विभाग : 57 किलो- अभिषेक हिंगे (मावळ), अमित कुलाल (शिरूर), 61 किलो- अभिषेक जाधव (मुळशी) , तेजस जाधव (भोर), ६५ किलो अतिश दिवटे (बारामती), प्रदिप नवाडे (हवेली), 70 किलो- करण फुलमाळी (हवेली), सनी भागवत (मुळशी), 74 किलो- शिवाजी टकले (बारामती), जय शिरस (हवेली), 79 किलो- अविनाश गावडे (इंदापुर), वल्लभ शिंदे (वेल्हा), ८६ किलो- चैतन्य मारकड (इंदापुर), जुनेद शेख (खेड), ९२किलो अक्षय खामजळ (इंदापुर) , ऋषीकेश गायकवाड (दौंड), ९७ किलो- रोहन जाधव (बारामती), यश इनामके (दौंड)
महाराष्ट्र केसरी– मनीष रायने(इंदापुर), सोमनाथ डोंबाळे (बारामती)








