मा. नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या माध्यमातुन नागरिकांसाठीच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या हस्ते…

0
slider_4552

बाणेर :

माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकाचे प्रकाशन भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या शुभ हस्ते तसेच भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले करण्यात आले.

माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या माध्यमातून परिसरातील नागरीकांच्या साठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाचे असणारे दिनदर्शिका दरवर्षी नागरिकांना दिल्या जातात. यावेळी किरीट सोमय्या यांनी आपल्या व्यस्त दोऱ्यातून गणेश कळमकर यांच्या घरी भेट देउन भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. तसेच परिसरातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढविला.

यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले की, दिनदर्शिका अतिशय सुंदर असून नागरिकांच्या उपयोगी पडतील अशी सर्व माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली आहे. नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील नगरसेविका ज्योती कळमकर आणि गणेश कळमकर नेहमी अग्रेसर असतात याचा आनंद वाटतो. पुढे देखील आपल्या कामाने नागरीकांच्या मनात आपले स्थान निर्माण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो

यावेळी माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते प्रकाश बालवडकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सुधीर ताम्हाणे, सागर ताम्हाणे, संदीप वाडकर, नितीन सायकर, अनिल कळमकर, लखन कळमकर आदि मान्यवर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक 9 च्या वतीने वकिलांचा सन्मान...