मागास विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीत वाढ करण्याचे मुख्यमंत्र्याचे आश्वासन ! सुनील माने यांची मागणी..

0
slider_4552

नागपूर  :

अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्यार्थांना परदेशी शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या अत्यंत कमी असल्याने, शिष्यवृत्ती संख्येत वाढ करावी अशी मागणी भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या संख्येत वाढ करण्याचे आश्वासन देत याबाबत लवकरच निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी माने यांना सांगितले.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशानादरम्यान माने यांनी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार कडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. मा. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना यांच्या सरकारच्या काळात परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ वरून ७५ करण्यात आली. मागील वर्षी महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी परदेश शिष्यवृत्ती संख्या वाढवून २०० करण्याची तसेच उत्पन्न मर्यादेत वाढ करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र सन २०२२ – २३ च्या प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत विद्यार्थ्याची संख्या तसेच उत्पन्न मर्यादा ही जैसे थे ठेवण्यात आली आहे.

मार्च २०२१ मध्ये समता प्रतिष्ठान मधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत केली होती. मात्र याबाबत कार्यवाही करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे  बार्टी मधील अनागोंदी कारभार, शिष्यवृत्ती भ्रष्टाचार याची सरकारने चौकशी करावी भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी. राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने आपण या विषयात लक्ष घालून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करावा अशी विनंती त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवत यासबंधी लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

See also  राज्यात सरसकट शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु