युवा नेते लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भजन स्पर्धेला सुरुवात..

0
slider_4552

बालेवाडी :

भाजपा युवा नेते लहू गजानन बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित, भव्य महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धेचे उद्घाटन हभप शांताराम महाराज निम्हण आणि मृदुंग वादक हभप पांडुरंग दातार यांच्या शुभहस्ते व सांप्रदायिक, राजकिय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेत पुरुष व महिलांच्या ८० संघांनी सहभाग घेतला आहे.

यावेळी सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांचा वतीने बोलताना संत सेवक मारुती कोकाटे म्हणाले की, राजकिय जीवनात विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना स्वतः च्या वाढदिवसाच्या निमित्तानं युवा नेते लहू बालवडकर यांनी सांप्रदायिक क्षेत्रासाठी महिला व पुरूष भजन स्पर्धेचे आयोजन करून भजन करणाऱ्या पुरूष व महिलांसाठी एक व्यासपीठ निर्माण करून चांगले काम केले त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असा उपक्रम राबवून एक चांगला आदर्श घडवला आहे.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश बालवडकर, हभप संजय बालवडकर, उद्धव गोळे, बबनराव चाकणकर ,गजानन बालवडकर, बन्शीअण्णा मुरकुटे, शेखरमहाराज जांभुळकर, शांताराम पाडाळे पाटील, विष्णू बालवडकर, अर्जुन टकले, धारुदादा बालवडकर, निवृत्ती कोळेकर, शांताराम बालवडकर, विश्वास कळमकर, माऊली जाधव, मारुती रानवडे, प्रकाश बालवडकर, बाळासाहेब बालवडकर, गहिनीनाथ कळमकर, भिमाजी बालवडकर, कांतीलाल बालवडकर, संजय बालवडकर पाटील, रोहित बालवडकर, विठ्ठल मांगडे, नंदाराम बालवडकर, किसन टकले, राजाभाऊ मुरकुटे, राजेंद्र मंगडे, तसेच याप्रसंगी विविध मान्यवर, पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

See also  बावधन महामार्गालगत सुशोभिकरण करण्याची सूर्यकांत भुंडे यांची मागणी.