बावधन :
आम आदमी पार्टी वतीने बावधन मधे आयोजित केलेल्या १० दिवसीय मोफत अॅक्युप्रेशर शिबीर ची सांगता झाली आणि त्याच बरोबर मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटनहि झाले. शिबिराचे आयोजन आरती करंजावणे, ज्योती ताकवले आणि कृणाल घारे यांनी केले होते.
कार्यक्रमाला “आप” चे प्रदेश संयोजक श्री. विजय कुंभार, आणि श्री अजय मुनोत यांची प्रमुख उपस्थिती होती. असे शिबीर घेण्याचे कारण हे आम आदमी पक्षाचं, उच्च दर्जाचे मोफत नागरिक आरोग्य सेवा, धोरण असल्याचे विजय कुंभार यांनी म्हटले. या वेळी कार्यक्रमाचे संचालक आबासाहेब कांबळे आणि सुदर्शन जगदाळे यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांशी सांवाद साधून त्यांचे अनुभव जाणून घेतले.
१० दिवसीय अॅक्युप्रेशर शिबिराचा फायदा १००० पेक्षा जास्त नागिरिकानी घेतला.आज उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांचे अनुभव व्यक्त करून अशे कार्यक्रम नियमितपणे घेण्याची मागणी केली. कार्यक्रमास आम आदमी पक्षाचे चे अमोल काळे, महादेव काळे, शेखर ढगे, ह्रिषीकेश मारणे आणि इत्यादी मान्यवर पण उपस्थित होते