औंध :
माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या वतीने परिसरातील नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी स्वतः सोबत अनोखे आणि वेगळा ‘फिटनेस चॅलेंज विथ सनी निम्हण’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामधे फंक्शनल ट्रेनिंग, झुंबा, योगा आणि मेडिटेशन हे दोन तासात चार सत्रामध्ये नामांकित प्रशिक्षकांसोबत शास्त्रोक्त पद्धतीने आणि प्रसिद्ध विषय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अधिकृत फिटनेस आणि योग तज्ञांच्या पॅनल सोबत हा उपक्रम राबविला जाणार आहे.
याबद्दल माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, नागरिकांचा नविन वर्षाचा संकल्प काय आहे याचा आँनलाईन आठ प्रश्नांचा अभिप्रायचा पोल घेतला होता. जवळ 8000 हजार लोकांनी आपले अभिप्राय नोंदविला. त्यामधे 26% लोकांनी आम्हाला फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे असे सांगितले. नियमित एक्सरसाइज करायची असा मी देखिल नविन वर्षाचा संकल्प केला आहे. स्व. आमदार विनायक (आबा) निम्हण नेहमी सांगायचे की, कोणतीही गोष्ट एकट्याने केली होत नाहि त्यात लोक सहभाग घेतला की चळवळ होते आणि धेय्य साध्य करणे शक्य होते म्हणूनच निरोगी शरीर बनविण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांसोबत 60 दिवस ‘फिटनेस चॅलेंज विथ सनी निम्हण’ हा उपक्रम सुरू करत आहे.
पुढे सनी निम्हण म्हणाले की, आतापर्यंत खूप प्रतिसाद या उपक्रमात सहभागी होऊन नागरीक देत असुन माझी परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की या नवीन वर्षी आपल्या सर्वांच्या आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त असावी याकरिता या आगळ्यावेगळ्या ‘फिटनेस चॅलेंज विथ सनी निम्हण’ या उपक्रमात खालील लिंक आधारे सहभागी होऊन स्वतःला तंदुरुस्त करावे असे आव्हान करत आहे.
यामधे ज्यांचे जास्त वेट लॉस, इंच लॉस, मसल्स गेन, होणार त्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
नामांकित प्रशिक्षक:
अमेय खोमणे(NSCA, USA)
शुभंकर ढवळे (फंक्शनल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर)
सोमनाथ पानसरे (सर्टिफाइड फिटनेस कोच)
देव पुजारी आणि टीम (फिटनेस ट्रेनर)
स्वाती पांढरे (योगा इन्स्ट्रक्टर)
सुप्रिया शिंदे (योगा इन्स्ट्रक्टर)
सारंगी एस. (योगा इन्स्ट्रक्टर)
खालील लिंक वर क्लिक करा आणि ‘फिटनेस चॅलेंज विथ सनी निम्हण’ या अनोख्या फिटनेस चॅलेंज मध्ये सहभागी व्हा.
नाव नोंदणी साठी लिंक:
https://sunnynimhan.com/fitness-challenge/
संपर्क : 8308123555
स्थळ : Athfit स्टुडिओ अभिमान श्री सोसायटी औंध पुणे.