राजकोट :
भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या T20I मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 7 जानेवारी रोजी राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये टीम इंडियाने 91 धावांनी विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली.
दुसऱ्या सामन्यातील पराभवाचा बदला भारताने घेतला. हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग तिसरी T20I मालिका जिंकून दिली. त्याचवेळी, भारताने ही मालिका जिंकल्यानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने ट्रॉफी घेतल्यानंतर वेगवान गोलंदाज मुकेश कुमार या ऑटोरिक्षा चालकाच्या मुलगा असलेल्या खेळाडूकडे ट्रॉफी सुपूर्द केली. त्यानंतर मुकेशने ट्रॉफी हवेत उंचावली, त्यानंतर संपूर्ण टीमने एकत्र सेलिब्रेशन केले. त्याचवेळी शिवम मावी आणि राहुल त्रिपाठी सुद्धा ट्रॉफी हातात घेताना दिसले.
शिवम मावी आणि राहुल त्रिपाठी यांनी या मालिकेतून भारतासाठी पदार्पण केले. मुकेश कुमारला पदार्पणाची संधी मिळू शकली नाही. त्याचवेळी मालिका जिंकल्यानंतर सर्व खेळाडू खूप आनंदी दिसत होते. याशिवाय या मोठ्या विजयानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या सूर्यकुमार यादवनेही राहुल त्रिपाठीला मिठी मारली.
भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जे खूप प्रभावी ठरले. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीमुळे भारताने निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 228 धावा केल्या.
यामध्ये श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. 229 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ केवळ 137 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे तो सामना श्रीलंका ९२ धावांनी हरला.
20 षटके पूर्ण होण्यापूर्वीच श्रीलंकेचा संघ भारतीय गोलंदाजांना बळी पडला. त्यानंतर पाहुण्या संघ 16.4 षटकांत 137 धावा करून पत्त्यासारखा विखुरला गेला. शिवम मावी वगळता सर्व भारतीय गोलंदाजांनी विकेट घेतल्या. याचबरोबर अर्शदीप सिंग सर्वाधिक ३ बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला.
हार्दिक पंड्या, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल यांनीही प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर अक्षर पटेलला ब्रेकथ्रू मिळाला. हा सामना जिंकून हार्दिक पांड्याच्या संघाने तीन टी-20 सामन्यांची मालिका जिंकली. मेन इन ब्लूने मालिका २-१ ने जिंकली.