पाषाण :
आरोग्याची काळजी घेता घेता डॉ. ना पण खेळाची आवड मजा घेता यायला हवी ह्या साठी ३६० सदस्य असलेल्या बाणेर बालेवाडी मेडी कोस असोसिएशन ने डॉ. व फॅमिली साठी लाईफ स्पोर्ट्स क्लब पाषाण येथे स्पोर्ट डे आयोजित केला होता.







त्यात क्रिकेट, बॅडमिंटन, स्पर्धा, टेबल टेनिस स्पर्धा तसेच काही मैदानी खेळ, फन गेम आयोजित केले होते.
क्रिकेट मध्ये लाईफ सेवर्स ह्या टीमने डॉ इच्चुर ह्यांच्या कॅप्टन शिप खाली विजेते पद मिळवले. क्रिकेट मध्ये महिला डॉ. चां पण सहभाग लक्षणीय होता.
बॅडमिंटन प्रकारात डॉ. पडोरे डॉ. पंडित व टेबल टेनिस स्पर्धेत डॉ. देशमुख विजेते ठरले.
प्लांका थोन ह्या मैदानी खेळ प्रकारात डॉ. शैलेश हाडगावकर विजेते ठरले.
लहान मुलांनी पण सर्व खेल प्रकारात भाग घेतला.
बक्षीस वितरण सोहळा मां श्री संदीप कर्णिक पोलिस सहआयुक्त तसेच मां डॉ. श्री अर्जुन देवरे रिजनल पासपोर्ट ऑफिसर ह्याच्या हस्ते करण्यात आला.
भविष्यात पोलिस अधिकारी व डॉ. ह्याच्या मध्ये काही खेळाचे आयोजन करता येईल, असे श्री संदीप कर्णिक सहआयुक्त यांनी सांगितले.
बाणेर बालेवाडी मेडिको स असोसिएशन तर्फे डॉ कविता चौधरी, डॉ अमोल जमखंदे, डॉ. बबन साळवे, डॉ. हरीश सोनार, डॉ बालाजी सदाफुले, डॉ. सुषमा जाधव यांनी आयोजक म्हणून काम केले.
डॉ. राजेश देशपांडे फौंडर प्रेसिडेंट यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. कविता चौधरी यांनी आभार मानले तसेच डॉ. अमोल जामखंडे यांनी सूत्रसंचालन केले.









