बाणेर :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त डॉ. दिलीप मुरकुटे पाटील यांच्या वतीने महिलांना साडी वाटप, सुसगावातील होऊन गेलेले आजी माजी सरपंच उपसपंच आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार तसेच सुसगावचे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासहेब चांदेरे यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे पाटील म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत असताना गोरगरीब महिलांना मदत करणे, समाजात चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान करून प्रेरणा देण्याचे काम करत आहे. तसेच शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी आपल्या परीसरात शिवसेना वाढविण्यास फार मोठे योगदान दिले त्यांचा वाढदिवस साजरा करत त्यांच्या कार्याचा सन्मान करत आहे.
यावेळी बोलताना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की,शिवसेना हा जात,धर्म लिंग यापलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. स्त्री पुरुष समानता मानणारा पक्ष आहे. एकाही राजकीय पक्षाने एखादा महत्वकांक्षी राजकीय उपक्रम महिलेला नेतृत्व करायला दिला नाही. परंतु शिवसेनेने महिलांच्या नेतृत्वात महाप्रबोधन यात्रा काढली. म्हणून महिलांना संधी देणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. डॉ.दिलीप मुरकुटे यांनी स्वतःसाठी काहीही न मागता नेहमीच पक्षाला प्राधान्य देत इतरांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या कृतीतून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ठाम निष्ठा दिसून येते. निष्ठावंत शिवसैनिकांच्या सोबत शिवसेना त्यांना बळ देण्यास मागे पुढे पाहणार नाही.
सत्कार मूर्ती बाळासाहेब चांदेरे म्हणाले की, डॉ. दिलीप मुरकुटे पाटील समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. एक शिवसैनिक म्हणुन कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करत असतात. शिवसेना त्यांच्या कार्याची दखल नक्की घेईल याची खात्री आहे. सुस महाळूंगे कर आता उशार झाले असुन योग्य योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम आहेत असे यावेळी त्यांनी आवर्जुन सांगितले.
यावेळी समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ, सत्कार मूर्ती बाळासाहेब चांदेरे, शिवसेना पुणे शहर प्रमुख गजनान थरकुडे, मा. नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, ॲड. लीना मुरकुटे, युगंधरा मुरकुटे, ॲड. पांडुरंग थोरवे, शंकर मांडेकर, गणपत मुरकुटे, प्रकाश बालवडकर (शेतकरी संघटना), दत्तात्रय तापकीर, गणेश मुरकुटे, मा. सरपंच नारायण चांदेरे, नामदेव गोलांडे, कालिदास शेडगे, सतिश रणवरे, संतोष मोहोळ, राम गायकवाड, किसन सुतार, श्याम बालवडकर, सिद्धेश गोलांडे, खंडू खैरे, संतोष भोसले, संतोष तोंडे, अनिल लिंगे, छाया पाडाळे, शालन पाडाळे, बिबिजान शेख, मंजु वर्मा, किरण वर्मा, वंदना चिव्हे, राजु शेडगे, संजय ताम्हाणे, वृषभ मुरकुटे, ॲड. दिलीप शेलार, विजय विधाते, कैलास आटोळे, रुपाली सायकर, सतिश मराठे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा थिगळे आणि सुस गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच धार्मिक क्षेत्रातील मान्यवर व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.