हिंजवडी :
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी पोपट श्रीहरी चांदेरे, वय ४४, रा. दत्त मंदिरा शेजारी, सुसगाव, हे कुटुंबासह बाहेर गावी गेले असता दिनांक २३/१२/२०२२ रोजी ते दिनांक२४/१२/२०२२ रोजी दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने सुसगाव ता. मुळशी येथील त्यांचे रहाते घराचा मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा कोणत्यातरी हत्याराचे साहयाने तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुमधील कपाटातील ११९ तोळे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली. म्हणुन हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १२४७/२०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान ५७ पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रीक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत संशयीत इसम व केटीएम मोटारसायकलची माहीती घेत असताना सपोनि सागर
काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सुस येथील घरफोडीतील संशयीत इसम हे स्प्लेडर क्र एम.एच.१२ / जेव्ही ८८०७ वरून बापुजी बुवा मंदीर फेज ३, येथे येणार आहेत. अशी बातमी मिळाल्याने सपोनि सागर काटे व पोलीस पथक यांनी ट्रॅप लाऊन सदर संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांचे नाव १) अजय सर्जा नानावत वय २७ वर्ष, रा. करमोळी पुलाजवळ ता. मुळशी जि. पुणे २) कन्हैया विजय राठोड, वय १९ वर्ष, रा. पाथरगाव, ता. मावळ, जि. पुणे असे सांगीतले. त्यांचेकडे अधिक तपास करता, अजय सर्जा नानावत याने “मी दिवसा सदर घराची रेकी करून रात्री माझे इतर साथीदार नामे १) कन्हैय्या राठोड २) मोहन ३) अनिरूध्द योगेश राठोड ऊर्फ नानावत व त्याचे दोन मित्र यांचेसह येऊन घरफोडी चोरी करून त्यातील मुद्देमाल हा आशा ठक्कर, रा. अहमदाबाद, गुजरात व अरमान नानावत, रा. वाघोली, पुणे यांना विकला असल्याचे सांगीतले व विकुन आलेली रक्कम रूपये ८,००,०००/- रू. बँक अकाऊंटवर जमा केल्याचे त्याने सांगीतलेने त्या दोघांना अटक करून पुढील तपासात त्यांनी १) हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५९१ / २०२२ भादवि कलम ४५४,४५७,३८०२) १०९२/२०२२, भादवि कलम ४५४,४५७,३८० हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
अजय सर्जा नानावत याने सागीतलेल्या आशा ठक्कर, रा. अहमदाबाद गुजरात हिचे तपास कामी सपोनि सागर काटे, पो.हवा. ३९४ धुमाळ, पो.ना. १५७६ नरळे, पोशि २२८४ पालवे, मपोशि सोनाली ढोणे असे तपास पथक यांनी गुजरात येथे जाऊन सलग १५ दिवस गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथे शोध घेतला असता अहमदाबाद येथील पथकास ती पुण्यात येणार असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथकाचे सपोनि राम गोमारे यांना त्याची माहीती देऊन आशा ठक्कर हिस पुण्यामध्ये ताब्यात घेतले. तीच्या निशान देही प्रमाणे अहमदाबाद येथे गेलेल्या तपास पथकाने ६६ तोळे सोन्याचे दागीने जप्त केले.
अशा प्रकारे अजय सर्जा नानावत याचेकडून सदर गुन्ह्याचे तपासात ४ तोळे सोने व ८,००,०००/- रू रोख रक्कम व महीला आरोपी नामे आशा राजूभाई ठक्कर हिचेकडून ६६ तोळे दागीने असे एकुण ७१ तोळे सोन्याचे दागीने व ८,००,०००/- रू रोख रक्कम जप्त करून तसेच ३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे.
उपरोक्त गुन्ह्यातील पाहीजे आरोपी व उर्वरीत मुद्देमाल याचा शोध घेत आहोत. अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असुन त्यांच्या नावे विविध गुन्ह्यांची नोंद आहे.
सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. मनोज लोहीया, पोलीस सह आयुक्त, मा. डॉ. श्री. संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड मा. श्री. श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक अजीत काकडे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, सुभाष गुरव, सोनाली ढोणे, श्रुती सोनावणे, शालीनी वचकल यांनी केली आहे.