बाणेर :
भारतीय जनता पार्टी कोथरुड विधानसभा अध्यक्ष पुनित जोशी यांच्या उपस्थितीमध्ये व नवनिर्वाचित प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र.०९ बाणेर-बालेवाडी-पाषाण-सुतारवाडी येथील भारतीय जनता पार्टी कार्यकारणी घोषित करण्यात आली.
बाणेर बालेवाडी प्रभागातील पदाधिकारी पुढील प्रमाणे.
अध्यक्ष महिला आघाडी:- स्वरुपा शिर्के
सरचिटणीस :- रोनक गोटे, सुभाषजी भोळ, गणेश चाकणकर, भारतसिंग लखावत
उपाध्यक्ष :- विशाल बालवडकर, सतिष बागल, कारभारी उपाडे, नैना पोळ.
चिटणीस:- सुरेश नळसाळे, बाळासाहेब मिसाळ, संदिप तुपे, श्रीकांत जाधव, रोहित पाटील, शिवम मुरकुटे, प्रशांत बालवडकर.
यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, भाजपा उपाध्यक्ष गणेश कळमकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगीळ, नवनाथ ववले, प्रल्हाद सायकर, सुंदरशेठ बालवडकर, मंदार राराविकर, भाजपा युवा वॅारियर्स अध्यक्ष शिवम बालवडकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 9 मधील बाणेरच्या विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी सहसा उपस्थित न राहणारे नगरसेवक अमोल बालवडकर पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रसंगी उपस्थित होते. यावेळी बाणेर बालेवाडी परिसरांमध्ये पुन्हा भाजपाची सत्ता आणण्यासाठी आपापसातले मतभेद बाजूला सारून एकजुटीने काम करण्याचे यावेळी ठरवण्यात आले.