पुणे :
बोपोडी, औंध रोड येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत फुटपाथ तसेच सायकल ट्रॅक करण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन आज शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी या भागाचे कार्यक्षम मा. नगरसेवक, पीएमपीएमएलचे मा.संचालक प्रकाश ढोरे, भाजप पुणे शहर सरचिटणीस दत्ता खाडे, शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, शहर चिटणीस सुनील माने, शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवी साळेगावकर, सरचिटणीस आनंद छाजेड , गणेश बगाडे, ज्येष्ठ नेते मा. बाळासाहेब पाटोळे, अनिल भिसे, प्रभाग आठचे अध्यक्ष गणेश स्वामी, उत्तम बहिरट, सुदेश जाधव, सूनिता रावत, निम्मा रेड्डी, सुप्रिया चौधरी, रेणुका रेठवडे, सचिन घोरपडे, राजेंद्रजी बहिरट, विजय नडे, देविदास रेड्डी, उमेश चौधरी, आकाश नितकर, श्री. भट्टी, सनी सॅम्यूयल, अमर रेठवडे, सचिन पुट्टोल, नित्यानंद जोसेफ, सुनील दैठणकर, संतोष भिसे, अनिल माने आदींसह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
केंद्र सरकारमार्फत स्मार्ट सिटी प्रकल्पाद्वारे देशातील शहरांचा नियोजनबद्ध विकास करण्यात येणार आहे. यासाठी निवडलेल्या शहरांमध्ये पुण्याचा ही समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात शहराच्या विकासासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अनेक विकासाचे प्रकल्प सुरु आहेत. विकासाच्या या प्रवाहात बोपोडी मागे राहू नये यासाठी स्मार्ट सिटीप्रकल्पा अंतर्गत पादचाऱ्यांसाठी प्रशस्त फुटपाथ तसेच सायकल ट्रॅक यासारखी कामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन आज शिवाजीनगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री.सिद्धार्थजी शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या भागाचे नगरसेवक प्रकाश ढोरे, तसेच दिवंगत नगरसेवक विजय शेवाळे यांनी ही बोपोडीचा स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले.