पुणे इंटरनॅशनल सेंटर च्या वतीने युकॅन पर्यावरण महोत्सवाचे आयोजन..

0
slider_4552

पुणे :

पुणे इंटरनॅशनल सेंटर (पीआयसी) ईईसीसी (एनर्जी, एनव्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज) तर्फे 11 फेब्रुवारी 2023 रोजी युकॅन (युथ क्लायमेंट अॅक्शन नेक्सस) पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सकाळी 10 ते सायंकाळी ४ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

हवामान सुरक्षित भविष्यासाठी भारतीय युवकांचा जाहीरनामा (इंडियाज युथ मॅनीफेस्टो फॉर अ क्लायमेट
सिक्युअर फ्युचर) मागील वर्षी विकसित करण्यात आला. पाचा मूळ हेतू तरुणांच्या मागण्या व्यक्त करणे आणि
हवामान विषयक कृती हा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट व्हावा हा आहे. पीआगसीचा ईईसीसी विभाग हा
प्रा. अमितव मलिक यांच्या नेतृत्वाखाली काम करतो.

या महोत्सवाच्या माध्यमातून हवामान बदल आणि पर्यावरणाशी निगडीत आव्हानांवर चर्चा व विचारांच्या देवाण घेवाणाद्वारे संभाव्य उपायांसाठी हवामान बदलाबाबत अधिक सखोल माहिती मिळवण्यास उत्सुक असलेले विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, संशोधक इत्यादींसाठी ही एक योग्य संधी आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर सुरू होण्याआधी हा महोत्सव त्यांना या विषयात विविध संधींबाबत परिचित करून देईल तर या क्षेत्रातील उद्योगांसाठी ही एक नेटवर्किंग संधी असेल. पर्यावरण पेठ या अनोख्या संकल्पनेसह या गोष्टी साध्य करण्याचा संस्थेचा हेतू आहे.

या कार्यक्रमाता आमदार रोहित पवार, आमदार सिध्दार्थ शिरोळे, डॉ. अजित रानडे, कुणाल खेमनार, पूनम
मेहता, आरजे संग्राम इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवामध्ये अनेक छोटे उपक्रम समाविष्ट असून याचे अंतिम ध्येय हे नागरिकांनी त्यांच्या राजकीय प्रतिनिधींकडून व सरकारी अधिकान्यांकडून हवामान बदलाविषयक सक्रीयता दाखविण्याची मागणी करण्यास प्रवृत्त करणे हा आहे. या उपक्रमाचा विस्तार करण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक पांच्यासह एक व्यापक जाळे तयार करण्याचा प्रयत्न आहे.

या महोत्सवामध्ये खालील उपक्रमांचा सहभाग आहे.

• पर्यावरण पेठ पुण्यातील 40 हून अधिक हरित व्यवसायांतर्फे प्रदर्शन
• करिअर कट्टा पर्यावरण क्षेत्रात करिअरच्या संधींबाबत पर्यावरण तज्ञांकडून तरूणांना मार्गदर्शन
• क्लायमेट अॅक्शन राऊंड टेबल क्लायमेट अॅक्शनच्या गरजेबाबत राजकीय प्रतिनिधींशी सखोल चर्चा
• क्लायमेट डायलेमा आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा
• इको- आंत्रप्रेन्युअर यांचे व्याख्यान
• सांगितिक व सांस्कृतिक कार्यक्रम

See also  संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यांचे आज पुण्यात आगमन.