चित्रकला हा जीवनाचा अविभाज्य भाग- संजय शेलार

0
slider_4552

औंध :

ग्राफिटी एक्सप्रेशन आर्ट इन्स्टिट्यूटच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनमध्ये नुकतेच पार पडले.यावेळी प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांनी ऑईल रंगातील व्यक्तिचित्र या विषयावर प्रात्यक्षिक दिले. तसेच प्रसिद्ध चित्रकार दिलीप दुधाने यांनी मोराचे जल रंगामधील सुरेख चित्र काढून दाखवले.

पालकांना मार्गदर्शन करताना, ‘चित्रकला हा जीवनाचा अविवाज्य भाग्य असल्याचे’ मत प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांनी मांडले.विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत प्रात्यक्षिक पार पडले. या चित्र प्रदर्शनात जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. ग्राफिटी संस्थेत शिकत असणाऱ्या ४ वर्षापासून ते ९० वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांनी विविध चित्रे काढून सहभाग नोंदवला.

निसर्ग चित्रे, वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग, स्थिरचित्र, ग्लास पेंटिंग, फॅब्रिक पेंटिंग, स्मरण चित्रे, म्युरल, एपॉक्सी अशा विविध माध्यमांची चित्रे या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. प्रदर्शनामधील प्रियंका आवारे, रवींद्र राऊत, अर्चना कुडाळकर, खुशबू चौधरी, हेजल अग्रवाल, अर्जुन मगर या विद्यार्थ्यांच्या चित्रांना विशेष कलाकृती म्हणून पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

दरवर्षी अशा प्रकारचे चित्र प्रदर्शन व प्रात्यक्षिक आम्ही भरवत असल्याचे ग्राफिटी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल शिंदे यांनी सांगितले.तर संस्थेच्या मुख्य संस्थापिका शितल शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

See also  नववर्षाच्या पूर्वसंध्येला औंध येथे 'दारू नको दूध प्या' अभिनव उपक्रम.