औंध :
आपल्या औंध परिसरातील विद्यार्थी प्रिय राऊत क्लासेस चे पंढरीनाथ राऊत यांना हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी योगीराज पतसंस्थेच्या वतीने 20 हजार योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांच्या हस्ते देण्यात आली. तसेच त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी 87 हजार रुपयांची मदत केली.
राऊत यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला व त्यांना तातडीने शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. शस्त्रक्रियेचा खर्च 4 लाख असताना परिसरातील माजी विद्यार्थ्यांनी 87 हजार रुपयांची तातडीने मदत केली.
राऊत यांचे काही माजी विद्यार्थी योगीराज पतसंस्थेचे संचालक, सभासद असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन योगीराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर यांनी संस्थेच्या वतीने 20 हजार रुपयांची मदत केली.
याप्रसंगी माजी विद्यार्थी अमर लोंढे, उद्योजक चौलवार, अभिजीत दुधाळ, बालगुडे साहेब, चार्टर्ड अकाऊंट टाळेकर, संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.