उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे छापे..

0
slider_4552

पुणे :

पुण्यात आज आयकर विभागाकडून सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर छापे टाकण्यात आले आहेत. अनिरुद्ध देशपांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे सहकारी समजले जातात.

काही महिन्यांपूर्वी अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयात आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा नव्याने आज सकाळी ही छापेमारी झाली आहे.

देशपांडे यांच्या सिटी ग्रुपशी संबंधित आठ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. यात डेक्कन आणि मगरपट्ट्याजवळ अ‍ॅमनोरा येथील कार्यालयांचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे अधिकारी इथं झाडाझडती घेत आहेत.

 

See also  धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा चंद्रकांत पाटील यांची मागणी.