नवी दिल्ली :
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा करत टीम इंडियाला पहिल्या डावात 262 धावांवर ऑलआऊट केलं.त्यामुळे कांगारुंना दुसऱ्या डावात 1 धावेची नाममात्र आघाडी मिळाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या दिवसाचा गेम संपला तोवर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 12 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 61 धावा केल्या. ट्रेव्हिस हेड 39 आणि मार्नस लाबुशेन 16 धावांवर नॉटआऊट आहेत.
विराट कोहली वादग्रस्त निर्णय
विराट कोहली याला टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 50 व्या ओव्हरमध्ये आऊट देण्याचा निर्णय हा वादग्रस्त ठरला. मॅथ्यू कुहनेमन ही ओव्हर टाकत होता. विराट या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एलबीडबल्यू आऊट झाला. विराट 44 धावांवर माघारी परतला. विराट याला वादग्रस्तरित्या आऊट दिल्याचं नेटकऱ्यांचं म्हणंन आहे. तसेच आऊट झाल्यानंतर विराटचा ड्रेसिंग रुममध्ये संताप पाहायला मिळाला.
अश्विन-पटेल यांची निर्णायक भागीदारी
लायनच्या फिरकीसमोर टीम इंडियाने सपशेल नांग्या टाकल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. टीम इंडिया अडचणीत असताना या दोघांनी डाव सावरला. या जोडीने आठव्या विकेट्ससाठी 124 धावांची निर्णायक भागीदारी केली. ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी डोकेदुखी ठरलेली. मात्र कॅप्टन पॅट कमिन्सच टीमच्या मदतीला धावून आला. पॅट कमिन्स याने ही सेट जोडी फोडली.
पॅटने अश्विनला आऊट केलं. पॅटने एकच विकेट घेतली पण ती विकेट फार निर्णायक ठरली. पॅटने अश्विनला 37 धावांवर बाद केलं. अश्विननंतर अक्षरही काही ओव्हरनंतर आऊट झाला. अक्षरने टीम इंडियाकडून सर्वाधिक 74 धावा केल्या.
नाथन लायन याचा ‘पंच’
नाथन लायन याने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. लायनने टीम इंडियाच्या 5 फलंदाजाना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. लायनने केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत आणि अक्षर पटेल या प्रमुख 5 जणांचा काटा काढला. लायनने 29 ओव्हरमध्ये 67 धावा देत ही कामगिरी केली.
सामन्याची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव – 263 रन्स 78 ओव्हर.
टीम इंडिया पहिला डाव – 262 रन्स 83 ओव्हर.
दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया – 61-1, 62 धावांची आघाडी