गणेशखिंड :
गणेशखिंड येथिल मॉडर्न कॉलेजच्या FBF ने 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी 23 दरम्यान RBI द्वारे घोषित आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा केला.
ज्येष्ठ बँकर श्री. सदानंद दीक्षित यांच्या हस्ते याचे उद्घाटन.1४ फेब्रुवारी रोजी’ माझ्या राष्ट्राचा माझा अभिमान’ चांगल्या आर्थिक वर्तनासाठी व सैनिकांची मूल्ये आणि गुण विद्यार्थ्यामधे विकसित करण्यासाठी मेजर श्री जीवन कांबळे, माजी विद्यार्थी, कला शाखा यांनी विद्यार्थ्यांना online मार्गदर्शन केले.
१५ फेब्रुवारी रोजी’ मेरा कार्ड मेरी पेहचान’ या अंतर्गत कॅम्पसमध्ये पॅन कार्ड नोंदणीचे शिबिर घेण्यात आले. यात पँन कार्डची नोंदणी विद्यार्थ्यांनी केली.
१६ फेब्रुवारी रोजी मॉडर्न हायस्कूल NCL येथे 11वीच्या विज्ञान विद्यार्थ्यांसाठी बँक मित्र आर्थिक साक्षरता जागृती शिबिर घेण्यात आले. यात ७० विद्यार्थी सहभागी झाले.महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक मा एम.सुजाता यांचे खुप सहकार्य लाभले.
१७ फेब्रुवारी 23 रोजीचा सांगता समारंभ जनरल मॅनेजर , रिझर्व्ह बँक आँफ ईंडिया, मुंबई, Financial Inclusion & Development Department, (FIDD)मा.श्रीमती कल्पना मोरे मॅडम, माननीय श्री. राजेंद्र देशमुख सर डेप्युटी जनरल मॅनेजर, राज्यस्तरीय बँकर्स समिती, मा.श्री. निखिल गुलाक्षी, लीड डिव्हिजनल आँफिसर FIDD ,आरबीआय मुंबई, श्री तरडे, लीड डिव्हिजनल आँफिसर, पुणे ,मा.श्रीकांत कारेगावकर. एलडीएम पुणे यांच्या उपस्थितीत झाली.
या प्रसंगी बोलताना मा कल्पना मोरे म्हणाल्या,”विद्यार्थी जीवनात उत्कृष्ट आर्थिक नियोजन करता येणे गरजेचे आहे. आजच्या युगात डिजिटल व्यवहार करताना काळजी घ्या. सरकार सामाजिक सुरक्षेसाठी व सामाजिक जीवनस्तर वाढविण्यासाठी अनेक योजना राबवीत आहे. त्याचा फायदा घ्या व ईतरांना त्या योजना समजावून सांगा.
विद्यार्थ्यांनी यावेळी जनसुरक्षा योजना या विषयावर पथनाट्य सादर केले. कार्यक्रमासाठी आरबीआयसह बँकिंग क्षेत्रातील मान्यवर असणे हा मॉडर्न कॉलेजसाठी अतिशय अभिमानाचा क्षण होता.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.संजय खरात आणि उपप्राचार्य डॉ.शुभांगी जोशी काॅमर्स विभाग हे उपस्थित होते.
साक्षरता सप्ताहाचे संयोजन करण्यासाठी फ्युचर्स बॅकर्स फोरमच्या अॅड. अदिती पिंपळे यांचे सहकार्य लाभले व डॉ.पल्लवी निखारे यांची उपस्थिती होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रा विजयालक्ष्मी कुलकर्णी यांनी केले. पी ई सोसायटीचे सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी अभिनंदन केले.