पुणे :
‘जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर पाकिस्तानची सीमारेषा आपल्या घराच्याजवळ आहे हे शोधावे लागले नसते’ असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. तसेच, त्यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही आपले विचार व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव नसून तो एक विचार आहे असे प्रतिपादन अमित शाह यांनी केली आहे.
शिवशृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन : पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी साकारण्यात आली आहे. येथे (21 एकर)मध्ये हे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. त्या शिवशृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सांस्कृतिक मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
जीवनातील धडे आणि शिकवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ या थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी शाह यांनी केले. ते म्हणाले, या थीम पार्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी जीवनकथेचे चित्रण तर होईलच, शिवाय त्यांच्या जीवनातील धडे आणि शिकवण भावी पिढ्यांपर्यंत पोहोचेल. त्यांची शिकवण लोकांना त्यांच्या भाषेचे आणि धर्माचे अभिमानाने आचरण करण्यास आणि स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार होण्यास प्रेरित करेल असही ते म्हणाले आहेत.
मुघल राजवटीपासून मुक्त होण्यासाठी ‘स्वराज’ हा शब्द निर्माण झाला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘स्वराज’च्या आदर्श आणि ध्येयांचा उल्लेख करून केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, त्यांनी स्वराज्य हा शब्द त्यांच्या प्रभावक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी नव्हे, तर मुघल राजवटीपासून देशाला मुक्त करण्यासाठी वापरला आणि त्यांच्या उत्तराधिकार्यांनी त्यांचा विचार पुढे नेला असही अमित शाह यावेळी म्हणाले आहेत.
मान्यवरांची उपस्थिती : पुण्यातील आंबेगाव येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी साकारण्यात आली असून 21 एकर मध्ये हे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. त्या शिवशृष्टीचा पहिला टप्पा पुर्ण झाले आहे. याचे आज उद्घाटनही गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांस्कृतिक मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.