गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात साजरी केली परदेशी तणांची होळी..

0
slider_4552

गणेशखिंड :

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात बायोस्फिअर्स व वनस्पती शास्त्र विभागा तर्फे तणहोळी हरित चळवळी अंतर्गत होळी साजरी करण्यात आली. बायोस्फिअर्स तर्फे ७ वर्ष १८ राज्यात ही होळी साजरी करण्यात येते.२०१६ पासून हा उपक्रम चालू आहे.

तण हे (उपद्रवी) वनस्पती अहेत. काही तणे देशी तर काही विदेशी असतात. यापैकी विदेशी किंवा आंगातुक तणे ही स्थानिक जैवविविधतेसाठी हानिकारक असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक वनस्पतींचा र्हास होतो.
साधारणपणे जल तणे,शेत तणे, वन तणे ही सर्वच हानिकारक आहेत. विदेशी प्राणी, कोरोना व्हायरस, चिलापी मासा हे ही उपद्रवी अहेत. उपद्रवी मासे किटक याच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.
ट्रीज काॅझरव्हेटिव्ह अँक्ट मधून उपद्रवी झाडांना वगळणे आवश्यक आहे. यासाठी कायद्यात बदल होणे गरजेचे आहे असे डाॅ शंकर लावरे म्हणाले.

रातमारी(टणटणी), उंदीरमारी, कॉसमॉस, हिप्टीस, गाजर गवत, चिमुक काटा, तिलपीया मासा, गप्पी मासा, मॅक्सिकन भुंगा इ प्रातिनिधीक चित्रांचे दहन करण्यात आले. विद्यार्थ्यांना या सर्व वनस्पती बघता आल्या.
जलपर्णी, पिवळा धोत्रा,जलकुंभी, बेशरम ही परदेशी जलतणे आहेत. यामुळे डास वाढतात, जलप्रदूषण होते. धनुरा, हरळी, लव्हाळा, ऒसाडी या तणांमुळे पिकांचे नुकसान होते.

म्हणून परदेशी तणांची होळी करु व देशी झाडे- पांगारा ,बाभुळ, निंब, अशे अनेक देशी झाडं आपण वाढवायला पाहिजे असे डॉ. सचिन पुणेकर- संस्थापक- बायोस्फिअर म्हणाले.

वनस्पतीच नाही तर माशांचेही जीवन धोक्यात आहे.यासाठी आम्ही २० व २१ मार्च रोजी महाविद्यालय काॅन्फरस घेत आहे. पर्यावरण जागृतीसाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे असे प्राचार्य डाॅ संजय खरात यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. रविंद्र जायभाये, भूगोल विभागाचे माजी प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,डाॅ शंकर लावते, प्राचार्य, सोनाई काॅलेज, अँडव्होकेट विठ्ठल देवखिळे, गिरिश अवधीत गोखले, सहकारी, हे उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दरवर्षी अशीच होळी साजरी करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे समन्वय डाॅ प्राची क्षीरसागर यांनी केले. प्रा स्वाती कंधारकर, उपप्राचार्य शास्त्र विभाग, उपस्थित होत्या. प्रा सुरेश तोडकर उपकार्यवाह, पी ई सोसायटी व डाॅ प्रकाश दिक्षित सहकार्यवाह पी ई सोसायटी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

See also  औंध आनंद पार्क रस्त्याबरोबरच शहरातील रस्ता रुंदीकरणावर नागरिकांचा आक्षेप.