बालेवाडी येथील शाळेतील समस्या सोडविण्यासाठी प्रकाश बालवडकर यांनी केलेल्या उपोषणाला यश..

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथील बाबुराव (शेठजी) गेणजी बालवडकर प्राथमिक विद्यामंदिर मनपा शाळा क्र. १५२ व १२१ मध्ये अनेक गैरसोयी असुन विद्यार्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वारंवार तक्रार करून देखिल पुणे महानगर पालिका व संबधित शिक्षण विभाग याची दखल घेत नव्हते म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या किसन बालवडकर यांनी गुरुवार दिनांक ९/३/२०२३ पासुन उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत शिक्षण विभागाच्या प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी उपस्थित राहून शाळे संधर्भात तक्रारींची दखल घेत त्याचे निराकरण कसे करणार याचे लेखी निवेदन दिल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते पाणी घेत उपोषण सोडले. प्रकाश बालवडकर यांच्या पत्नि शोभा यांनी ही घरी उपोषण केले होते, त्यानीही यावेळी हे उपोषण सोडले.

या वेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश किसन बालवडकर म्हणाले की, शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या दुर होणार आहे याचा आनंद आहे. लेखी निवेदन दिल्याप्रमाणे शिक्षण विभागाने लवकरात लवकर सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. या वेळी मला उपोषण करत असताना शाळेत येणाऱ्या विद्यार्थांनी उपस्थित राहून माझा उत्साह वाढविला तसेच पालक आणि बालेवाडी ग्रामस्थ तसेच परिसरातील सर्व पक्षीय नेत्यांनी मला पाठींबा देत माझा उत्साह वाढविला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानत आहे.

यावेळी शिक्षण विभाग प्रमुख मीनाक्षी राऊत यांनी सांगितले की, शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत असणारे प्रश्न त्वरित सोडविणार आहे. तसेच इतर प्रश्न संबधित विभागांशी पाठपुरावा करून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसे लेखी निवेदन उपोषण सोडविण्यासाठी देत असुन प्रकाश बालवडकर यांनी उपोषण सोडावे अशी विनंती करत आहे.

यावेळी माजी नगरसेवक ज्ञानेश्र्वर तापकीर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, अशोक मुरकुटे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, भाजपा ओबीसी नेते प्रल्हाद सायकर, प्रकाश दशरथ बालवडकर, लहू बालवडकर, शिवसेनेचे शाम बालवडकर, गणेश बालवडकर, युवराज धनकुडे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी औंध- सुरेश उचाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ग्रामस्थ विध्यार्थी आणि पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

See also  होम क्वारंटाईन नागरिकांसाठी घरपोच सेवेचे अभियान सुरु : सनी निम्हण यांचा अभिनव उपक्रम