पुणे जिल्हा महिला कबड्डी संघाने पटकावले “२१ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक” स्पर्धेचे विजेतेपद! पुरुष गटात मुंबई शहर विजेता..

0
slider_4552

जळगाव :

जळगाव येथे “२१ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक” पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याच्या महिला संघाने मुंबई उपनगर चा 37-28 असा 9 गुणांनी पराभव करून अंतीम विजेतेपद पटकावलं तर पुरूष विभागात मुंबई शहर संघाने 28-25 असा 3 गुणांनी अहमदनगर संघाचा पराभव करून अंतीम विजेतेपद पटकावलं.

महिला गटात झालेल्या अंतिम सामन्यात आम्रपाली गलांडे ने चढाईत केलेल्या जबरदस्त खेळामुळे, तर साक्षी गावडे, आणि पूजा शेलार यांच्या पकडी मुळे सामन्यावर पकड मिळवत विजय मिळविला तर पराभूत संघाकडून हरजित कौर संधू हिचा प्रयत्न एकाकी ठरला. शेवटच्या पाच मिनिटापर्यंत चुरशीने सूरु असलेल्या सामन्यांत निकिता पडवळ ने एकच चढाई मधे पाच खेळाडू बाद करत सामना एकतर्फी केला.

पुणे जिल्हा संघाचे प्रशिक्षक संदिप पायगुडे यांचे मार्गदर्शक मोलाचे ठरले तर स्पर्धेचे निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी आंतरराष्ट्रीय पंच दत्ता झिंझुर्डे काम पाहिले.

पुरूष विभागात मुंबई शहर आणि अहमदनगर संघात चुरशीच्या लढतीत प्रणय राणे च्या चढाया आणि सुशांत सैल आणि हर्षद लाढ ने केलेल्या पकडी मुळे मुंबई शहर संघाची सरशी झाली तर शिवम पठारे, संकेत खलाटे ची झुंज अपयशी ठरली.

See also  रोहित शर्मा झाला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार