माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांच्या प्रयत्नातून बाणेर येथील अथश्री सोसायटी येथे सुरू झाले “अथश्री रिक्षा स्टॅन्ड”.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथील अथश्री सोसायटी येथे “अथश्री रिक्षा स्टॅन्ड” चा उद्घाटन सोहळा माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांच्या प्रयत्नातून सोसायटीतील व परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

नागरिकांना अत्यंत कमी वेळेत त्यांच्या सोयीसाठी रिक्षा स्टॅन्ड सुरु करून दिल्याबद्दल अथश्री सोसायटीतील नागरिकांनी माजी नगरसेविका ज्योती कळमकर आणि भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर यांचे आभार मानले.

यावेळी बोलताना गणेश कळमकर म्हणाले की, लोकप्रतिनिधी या नात्याने परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे हे आमचे कर्तव्य आहे. नागरिकांची सेवा करताना मिळणारा आनंद ऊर्जादायी ठरतो. आमचा नेहमीच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध राहण्याचा प्रयत्न असतो. नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण करण्यात आम्हाला समाधान मिळते.

या रिक्षा स्टॅन्ड च्या उदघाट्नप्रसंगी ऋचा घाटे, स्वाती आरोस्कर, प्रतिभा भेंडे, नीला वैद्य, वैशाली वैद्य, वासुदेव महाजन, श्री.थत्ते, श्री. वाबळे, तसेच प्रवीण शिंदे, लखन कळमकर, संदीप कळमकर, श्रीकांत जाधव, श्री. पिंगळे सर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  वसुंधरा अभियान बाणेर संस्थेला 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार' राज्यस्तरीय -पुणे विभागातून, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर