अरुणाचल प्रदेश :
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यात भारतीय सैन्यदलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सकाळी ९.१५ च्या सुमारास हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटल्याचे सैन्यदलाला लक्षात आले. काही वेळानंतर मंडाळा येथून धुराचे लोट उठताना दिसले.







भारतीय लष्कराचे शोध पथक पाहणी करण्याकरिता घटनास्थळी रवाना झाले आहे. दरम्यान, यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती लष्करी अधिगकाऱ्यांनी दिली आहे.
हेलिकॉप्टर बेपत्ता होण्याच्या वेळी पायलट गटाचे सदस्य आणि पायलट यांच्यासह एक वरिष्ठ लष्करी अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार त्यांनी दिरांगपासून सुमारे 100 किमी अंतरावर मांडला बाजूने धुराचे लोट दिसू लागले. धुराचे लोट पाहताच अरुणाचल प्रदेश पोलिसांचे पथकदेखील घटनास्थळी रवाना झाले आहे. वैमानिकांचा शोध घेण्यासाठी सैन्यदलाचे शोध पथक मंडलाच्या दिशेने रवाना झाले आहे. गुवाहाटीमधील संरक्षण दलाचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत यांनी सांगितले की, अरुणाचल प्रदेशातील बोमडिलाजवळ आर्मी एव्हिएशन चीता हेलिकॉप्टरचा आज सकाळी 9:15 वाजता नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याची माहिती मिळाली. बोमडिला पश्चिमेकडील मंडलाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.
https://twitter.com/ANI/status/1636339281529544705?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1636339281529544705%7Ctwgr%5E824643db6d5e99a1a5fc5bd0ed3aced4bf3c3960%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F








