वसुंधरा अभियान बाणेरचा महाराष्ट्र सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ राज्यस्तरीय तृतीय क्रमांक देऊन केला हरित कार्याचा सन्मान..

0
slider_4552

पुणे :

बाणेर येथील वसुंधरा अभियानाच्या इतिहासातला सर्वोच्च पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या वतीने, आज राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, वसुंधराच्या १६ वर्षांच्या हरित कार्यास, आज महाराष्ट्र शासनाचा वृक्षारोपण मधील सर्वोच्च असा “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार- राज्यस्तरीय तृतीय क्रमांक” यांनी सन्मानित करण्यात आले.

बाणेर येथिल ओसाड डोंगरावर तुकाई टेकडी जवळ जवळपास ४३००० हजार विविध पुर्ण झाडांनी हिरवाईने सहज सुंदर नटविल्याने वसुंधरा अभियानाने गेली सोळा वर्षे कठोर परिश्रम घेत केलेल्या हिरवाईला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला हि परिसरातील सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. बाणेर बालेवाडी सारख्या स्मार्ट परिसराला सिमेंट काँक्रीट जंगल न ठेवता हिरवाई ने परिसर नटवत सर्वांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मोलाचा वाटा उचलणाऱ्या वसुंधरा अभियानाचा योग्य सन्मान झाला आहे.

*पहा बाणेरच्या वसुंधरा अभियानाने पटकविला राज्य सरकारचा छत्रपती शिवाजी वनश्री पुरस्कार*

यावेळी वसुंधरा अभियानाच्या सर्व सदस्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना भुजबळ सरांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार सर्व सदस्यांच्या अपार मेहनतीचे फळ आहे. गेल्या सोळा वर्षात, संस्था ऊभारणीत अनेक संकटे आली, खूप त्रास झाला, शेवटी त्याचे आज फळ मिळाले. आपल्याला आतापर्यंत अनेक सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत, परंतु शासनाच्या स्तरावर सर्वोच्च असा पुरस्कार संस्थेला आज मिळाला, अतिशय मनःपूर्वक अभिनंदन सर्व सदस्यांचे. पुरस्कार हे आपले अंतिम ध्येय नसून ,आपले हरित कार्य करण्यास हे पुरस्कार प्रेरणा देत असतात, यामुळे नवीन सदस्य जोडण्यास मदत होते.

पुढे ते म्हणाले फार कष्टातून ही संस्था उभी राहिली आहे, अनेक संकटे आली, तरी न डगमगता ही संस्था उभी राहिली आणि आज त्याचा सन्मान वन मंत्री, पालकमंत्री यांच्या हस्ते झाला. राज्यात तिसरा क्रमांक – पन्नास हजार रुपये व स्मृतीचिन्ह हे देऊन महाराष्ट्र शासनाने संस्थेच्या हरित कार्याला आणखी बळ देण्याचे काम हे पुरस्काराने मिळाले आहे. व्यक्त करण्यास शब्द नाहीयेत, डोळ्यांमध्ये अति आनंदाचे अश्रू आहेत. सर्वच सदस्यांचे मनःपूर्वक आभार आणि त्रिवार धन्यवाद.

See also  खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंटसह देशातील सर्व कँटोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क आकारणे थांबविले