रामनदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात पीएमसी विरुध्द NGT मध्ये याचिका दाखल..

0
slider_4552

पुणे :

प्रशासनाचा जाणूनबुजून निष्काळजीपणा आणि सर्व पर्यावरणविषयक कायदे आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या रामनदीच्या प्रदूषणाच्या संदर्भात PMC + 3 इतरांविरुद्ध NGT मध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे.

या याचिकेत प्रतिवादींना रामनदीतील विसर्ग त्वरित थांबवण्यासाठी, विविध पाण्याच्या झऱ्यांचे रक्षण आणि नदीचे पावित्र्य पुनर्संचयित करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

याचिकाकर्ते कृणाल घारे म्हणतात, “आम्ही प्रामाणिकपणे विशेषत: नदीचे झालेले नुकसान लक्षात घेता, प्रशाषण कडून अधिक सहकार्यात्मक पद्धतीची अपेक्षा केली होती, परंतु प्रशासनाला राहत नदी विषयी गांभीर्य नाही हे लक्षात येत नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागले. आम्हाला आशा आहे की न्यायाधिकरण आमच्या चिंता समजून रामनदीचे पावित्र्य पुनर्संचयित करन्याचे निर्देश देतील ”

See also  अमोल बालवडकर फाऊंडेशन च्या माध्यमातून "शाळा परिसर ट्रॅफिक फ्री अभियान" ला सुरुवात.