पाषाण :
पाषाण येथील बालाजी चौकात सूरु असलेल्या फूटपाथ च्या कामासाठी jcb ने खोदाई चालु असताना पिण्याच्या पाण्याचा पाईप फुटुन हजारो लीटर पाणी वाया गेले. सद्या पाणी टंचाई बाबत बाणेर, बालेवाडी, पाषाण भागात मोठया तक्रारी येत असताना अशा प्रकारे पाणी वाया जात आहे. नागरिकांनी पाणीपुरवठा विभागास सदर पाणी वाया जात असल्याचे सांगितल्यानंतर पाणी बंद करण्यात आले. जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ हजारो लिटर पाणी वाया गेले.







युवा नेते रोहन कोकाटे यांनी सांगितले की, पाषाण सुस रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोणतेही नियोजन न करता फूटपाथसाठी खोदायचे काम चालू आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात समस्या उभ्या राहत आहे. वारंवार तक्रार करून देखील पुणे मनपाJE शीतल जोशी मॅडम आणि ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. कामांमध्ये कोणतेही नियंत्रण आणि नियोजन नसल्याने या भागातील सोसायटी वर्गांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राढा रोडा लगेच काढला जात नाही. जेसीपी ने चुकीच्या पद्धतीने उकारल्याने आज हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.
*पहा पाषाण येथील बालाजी चौकात फूटपाथ कामामुळे हजारो लिटर पाणी वाया..*
फुटपाट चे काम सुरू असताना जेसीपी ने मोठ्या प्रमाणात खोदाई चालू आहे. त्याचा राडाराडा व्यवस्थित मार्गी न लावल्याने अपघात होण्याचा धोखा निर्माण झाला आहे. अगोदरच कमी असणारा रस्ता फूटपाथ मुळे आणखी कमी होत असुन त्यामूळे ट्रॅफिक प्रमाण देखिल वाढले आहे.
याबाबत महापालिकेच्या JE शीतल जोशी मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता काम व्यवस्थित करण्यासाठी सूचना ठेकेदारास देऊ असं त्यांनी सांगितले.
यावेळी अशोक दळवी, प्रदिप हुमे, अमित शिंदे l, विनायक कोकाटे, आणि नागरीक उपस्थित होते.








