सुखाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिर्णोद्धार केलेला इंदिरावसाहत मधील श्री हनुमान मंदिराचे उद्घाटन अविनाश कांबळे यांच्या हस्ते संपन्न..

0
slider_4552

औंध :

सुखाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून इंदिरावसाहत मधील श्री हनुमान मंदिराचे जीर्णोत्तराचे काम हाती घेण्यात आले होते. ते काम अतीशय सुंदर असे पुर्ण झाले आहे. या मंदिराचे उद्घाटन हनुमान जन्मोत्सवानिमित्त नागरिकांच्या उपस्थित सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

याबद्दल माहिती देताना सुखाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी सांगीतले, इंदिरा वसाहती मधील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार करणे गरजेचे होते. मोठया प्रमाणावर या परीसरात भाविक दर्शन घेत असतात. नागरीकांना मंदिरात प्रसन्न व छान वाटावे म्हणूनच श्री हनुमान मंदिराचे जीर्णोत्तराचे काम हाती घेतले आणि ते पूर्ण करता आले याचे समाधान आहे.

सुखाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून या परीसरात विविध समाज उपयोगी कामे मार्गी लावली जातात. तसेच नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.

See also  पुण्यात एलआयसी मुख्यालयाबाहेर आम आदमी पार्टीची निदर्शने