बाणेर :
वैद्यकीय सेवेत ३० वर्ष सेवा केल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ औंध तर्फे डॉ राजेश देशपांडे यांचा रविवारी बाल कल्याण येथे. गौरव करण्यात आला. डॉ. देशपांडे यांनी बाणेर बालेवाडी येथे ३० वर्षा पूर्वी अगदी रक्त तपासणी, ई सी जी इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या,तसेच अतिशय कमी दरात डिलिव्हरी व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
आजपर्यंत सुमारे तीन लाख रुग्ण तपासणी करण्यात आली. अनेक शिबिरे,शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी डॉ. देशपांडे यांनी पुढाकार घेत मार्गदर्शन केले. सहा वर्षापूर्वी ५ डॉ सोबत घेऊन सुरू केलेली बाणेर बालेवाडी मेडिकल असोसिएशन आज ४०० डॉ ची संघटना झाली आहे. एकप्रकारे बाणेर बालेवाडी भागात डॉ. देशपांडे यांनी मेडिकल क्रांती घडवून आणली आहे. त्यामार्फत अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात.