मोहाली :
गुजरात टायटन्स टीम पुन्हा एकदा विजयी ट्रॅकवर आली आहे. गुजरातने पंजाब किंग्सवर त्यांच्या घरात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. शेवटच्या 2 चेंडूंत 4 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने खणखणीत चौकार ठोकत पंजाबचा एक चेंडू आणि 6 विकेटनी विजय मिळविला.
पंजाबने विजयासाठी दिलेलं 154 धावांचं आव्हान हे गुजरातने 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. गुजरातकडून शुबमन गिल याने 67 धावांची खेळी केली. शुबमनचं या मोसमातील हे दुसरं अर्धशतक ठरलं. गुजरातने आतापर्यंत एकूण 7 सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना सहावा विजय मिळवला आहे. तर गुजरातचा हा या मोसमातील तिसरा विजय तर पंजाबचा दुसरा पराभव ठरला.