पाषाण, सुतारवाडी, सुसरोड रस्त्यावरील वृक्षांच्या अनावश्यक फांद्या छाटणीबाबत शिवम सुतार यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन…

0
slider_4552

पाषाण :

पाषाण, सुतारवाडी, सुसरोड रस्त्यावरील वृक्षांच्या अनावश्यक फांद्या छाटणीबाबत आज औंध – बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे यांची माजी स्वीकृत सदस्य शिवम सुतार भेट घेतली आणि निवेदन दिले.

याबद्दल माहिती देताना शिवम सुतार यांनी सांगितले की, राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते बालाजी चौक, साई चौक ते गिरीराज चौक येथील रोडलगत असणाऱ्या झाडांच्या फांद्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अचानक येणाऱ्या वादळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी या फांद्या तूटून पडल्या आहेत.

सद्या अचानक येणाऱ्या अवकाळी पावसामुळे जोरदार वादळी वारा विजांचा कडकडाट मोठया प्रमाणात होत आहे. म्हणूनच वादळ वारा पावसामुळे कोणती दुर्घटना घडू नये याकरिता धोकादायक असणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करून द्यावी, अशी मागणी औंध क्षेत्रीय कार्यालय साहाय्यक आयुक्त यांना निवेदन देउन केली आहे.

 

See also  पाषाण टेकडीवरील जोडप्याला मारहाण करुन लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चतुःश्रृंगी पोलीसांनी केले जेरबंद