औंध :
शिवाजी नगर चे भाजपा आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने सचिन मानवतकर ( सदस्य-भाजपा ) यांच्या नियोजना खाली शासन आपल्या दारी या मोहिमे अंतर्गत औंध येथील कस्तुरबा व इंदिरा वसाहती मधील नागरीकांसाठी रेशन कार्ड दुरुस्ती व / नविन नाव लावने / अन्नसुरक्षा योजना / दुबार रेक्षन कार्ड.. या साठी रेशन कार्ड कॅम्प लावण्यात आला होता.
नागरीकांना विविध योजनांचा लाभ घेता यावा रेशन कार्ड सारख्या आवश्यक अन्नसुरक्षा योजना व दुबार रेशन कार्ड सहज बनविण्यासाठी आवश्यक अर्ज एकाच ठिकाणी भरुन या सुविधा कशा मिळवून देता येईल या करिता आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहे. कस्तुरबा वसाहतीतील महिला व नागरिकांनी या शिबिरास मोठा प्रतिसाद दिला आहे.
या कार्यक्रमा साठी गणेश बगाडे, सचिन वाडेकर, बाळासाहेब रानवडे, सुरज गायकवाड, सौरभ कुंडलिक, अनिल भिसे, सोमनाथ भोसले, बंडु कदम, जितु खेतावत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन- सचिन मानवतकर मित्र परिवार यांनी केले होते.