महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 7 ते 8 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू, शेकडो अत्यवस्थ..

0
slider_4552

मुंबई :

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात 7 ते 8 श्री सदस्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असून शेकडो श्री सदस्य अत्यवस्थ असल्याची माहिती आहे.

अत्यवस्थ सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आ
ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. राज्यभरातून लाखो श्री सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेण्यात पार पडला.

त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यातील 7 ते 8 श्री सदस्यांचा उष्माघातने मृत्यू झाल्याची माहिती स्वत: मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अत्यवस्थ असल्येल्या श्री सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी डॉक्टरांना भेटलो आणि त्यांच्याशी या विषयी बोललो. अनेक लोकांना उष्माघातामुळे त्रास झाला आहे. ही दुख:द घटना आहे, मनाला वेदना देणारी घटना आहे. जखमी रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारकडून करण्यात येणार असल्याचं देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

तसेच रुग्णांना चांगल्यात चांगले उपचार देण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या घटनेत मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

See also  नवीन नियमावली नुसार मुंबई महापालिका बरखास्त होवून प्रशासकीय राजवट लागू होणार !