महाळुंगे :
दिल्ली येथे झालेल्या नवव्या स्टुडंट्स ऑलम्पिक नॅशनल गेम्स-२०२२-२३ स्पर्धेत दोनशे मीटर धावण्याच्या क्रिडा प्रकारात महाळुंगे (पाडाळे) येथील प्रिया सागर पाडाळे हिने रजत पदक पटकावले आहे.
तसेच या यशानंतर तिची राष्ट्रीय संघातही निवड झाली आहे. या यशाबद्दल तिचे सव स्तरातून अभिनंदन केले जात आहे. रविंद्र त्रिभुवन यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
प्रिया सागर पाडाळे हिने अपार कष्ट घेत रजत पदक मिळवत गावाचे नाव मोठे केले म्हणून महाळुंगे गावच्या वतीने प्रियाचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.