प्रो कबड्डी लीग ने औपचारिकरित्या बहुप्रतीक्षित VIVO प्रो कबड्डी लीगच्या (PKL) पुनरागमनाची घोषणा केली असून सीझन 8 साठी खेळाडूंचा लिलाव 29 ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान होणार आहे. सीझन 8 च्या खेळाडूंचा लिलाव सुमारे दोन वर्षांच्या अंतरानंतर लीगचे पुनरागमन निश्चित करेल. सीझन 8 खेळाडूंच्या पूलमध्ये 500 पेक्षा अधिक खेळाडूंच्या समावेशाने विस्तार केला गेला आहे. यामध्ये पीकेएल सीझन 6 आणि 7 मधील सर्व पथकातील खेळाडू तसेच 2020 आणि 2021 च्या AKFI वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपच्या शीर्ष 8 क्रमांकाच्या संघांचे प्रतिनिधित्व करणारे सर्व खेळाडू सामील आहेत.
यंदाच्या खेळाडूंच्या लिलावात घरगुती, परदेशी आणि नवीन तरुण खेळाडू (NYPs) चार श्रेणींमध्ये विभागले गेलेले असतील.
श्रेणी A, B, C आणि D अशा आहेत. प्रत्येक श्रेणीमध्ये खेळाडूंना ‘ऑल-राऊंडर्स’, ‘डिफेंडर’ आणि ‘रेडर्स’ म्हणून विभागले जाईल. प्रत्येक श्रेणीसाठी बेस प्राईज श्रेणी A – 30 लाख, श्रेणी B – 20 लाख, श्रेणी C – 10 लाख, श्रेणी D – 6 लाख आहेत. तसेच सीझन 8 साठी प्रत्येक फ्रँचायझीला त्याच्या पथकासाठी एकूण वेतन पर्स 4.4 कोटी रुपये देण्यात आली आहे. प्रत्येक पीकेएल सीझनसाठी संघांना एलिट रिटेन प्लेयर्स श्रेणी अंतर्गत सहा खेळाडूंना आणि निर्धारित अटींनुसार सहा नवीन युवा खेळाडूंना (एनवायपी) रिटेन करण्याची परवानगी दिली जाते. प्लेअर पूलमधील 500 पेक्षा अधिक खेळाडूंपैकी, फ्रँचायझींनी ज्या खेळाडूंना कायम ठेवले नाही त्यांचा मुंबईत तीन दिवसांच्या कालावधीत लिलाव केला जाईल.
कोराना व्हायरसमुळे गेल्या वर्षी प्रो कबड्डीचे आयोजन होऊ शकले नाही. दुसरीकडे, प्रो कबड्डी लीगचा सातवा हंगाम बंगाल वॉरियर्सने जिंकला आणि अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. याशिवाय, सर्व संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवतात आणि कोणत्या खेळाडूंना लिलाव पूलमध्ये ठेवतात हे पाहणे मनोरंजक असेल.