भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी घेतली आंदोलक कुस्तीपटूंची भेट…

0
slider_4552

नवी दिल्ली :

आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंबद्दल असंवेदनशील असल्याबद्दल सर्व स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत असलेल्या (P. T. Usha) भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी बुधवारी जंतरमंतर येथे आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतली व त्यांना त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कुस्तीपटूंनी आपल्या समस्या सोडविण्यासाठी आयओएकडे जाण्याऐवजी पुन्हा आंदोलन सुरु केल्याबद्दल माजी धावपटू उषा यांनी नाराजी व्यक्त केली होती. कुस्तीपटूंनी काही शिस्त दाखवायला हवी होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली होती. त्युळे त्यांच्यावर व आयओएवर जोरदार टीका झाली.

यावेळी पी. टी. उषा (P. T. Usha) यांनी आंदोलक कुस्तीपटूंशी संवाद साधला, मात्र माध्यमांशी न बोलता त्या निघून गेल्या, पण बजरंग पुनिया यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिल्याचे सांगितले. पी. टी. उषा आम्हाला भेटल्या व आंदोलनाला पाठिंबा दिला. ती प्रथम अ‍ॅथ्लिट आहे व नंतर प्रशासक आहे. तिने आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करेल, असे बजरंगने सांगितले.

आम्हाला न्याय हवा आहे असे आम्ही त्यांना म्हणालो. आमचे सरकार किंवा विरोधक किंवा इतर कोणाशीही भांडण नाही. आम्ही कुस्तीच्या हितासाठी येथे बसलो आहोत. डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष बि’जभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोप सिद्ध झाले, तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हायला हवी, असेही त्याने सांगितले. पीटी उषा यांनी म्हणणे ऐकून घेतले व मी तुमच्यासोबत आहे, असे म्हणत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. माजी क्रीडापटू आणि स्वतः एक महिला असूनही कुस्तीपटूंचा दृष्टीकोन समजून न घेतल्यामुळे (P. T. Usha) पी. टी. उषा यांच्यावर टीका झाली होती.

See also  चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलां - मुलींच्या संघांची विजयी सलामी.