समलोचान करता करता केदार जाधव ची लागली लॉटरी, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने केले करारबद्ध…

0
slider_4552

आयपीएल :

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या उर्वरित हंगामासाठी भारताचा अनुभवी फलंदाज केदार जाधव याला करारबद्ध केले आहे. जखमी अष्टपैलू डेव्हिड विली याच्या जागी त्याला संधी देण्यात आली.

आयपीएल लिलावात विकला न गेलेल्या केदारचे पुनरागमन सर्वांना चकित करणारे होते. आयपीएल दरम्यान समालोचन करत असलेल्या केदारला अचानक कशी संधी मिळाली, याबाबत त्याने स्वतः खुलासा केला आहे.

स्पर्धेचा निम्मा हंगाम उलटून गेल्यावर केदारला आरसीबीमध्ये निवडले गेले. डेव्हिड विली मायदेशी परतल्याने त्याला ही जागा मिळाली. या करारानुसार त्याला 1 कोटी रुपये देण्यात येतील. आपल्या या पुनरागमनाविषयी बोलताना तो म्हणाला,

“मी समालोचन करत होतो. त्यावेळी संजय बांगर यांचा मला कॉल आला. काय करतो असे विचारल्यानंतर मी समालोचन करतोय असे सांगितले. त्यांनी सराव सुरू आहे का आणि फिटनेस कसा आहे असे विचारल्यानंतर, मी आठवड्यातून दोनदा सराव करत असून, फिटनेस आहे असे उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी मला मी पुन्हा कॉल करेल असे सांगितले.”

केदार आयपीएलमध्ये विकला न गेल्यानंतर समालोचन करत होता.

See also  रोमहर्षक सामन्यात  पाकिस्तानने भारताला केले पराभुत..