औंध :
दरवर्षी प्रमाणे साजरा होणारा औंध गाव ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज उत्सव २०२३ मोठया उत्साहात साजरा होणार असुन, त्यानिमित्त दिनांक १४ मे ते १८ मे रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम औंध गाव विश्वस्त मंडळ आणि समस्त औंध गाव ग्रामस्थ यांच्या वतीने घेण्यात येणार आहे.
याबद्दल माहिती देताना औंध गाव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष योगेश जूनवणे यांनी सांगितले की, औंध गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ उत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील विविध धार्मिक, सांस्कृतिक, व कुस्त्यांचा जंगी आखाड्याचे तसेच लहान मुलांसाठी देखिल बाल मेळाव्याचे आयोजन केले आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी, भाविकांनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत आपल्या गावच्या भैरवनाथ महाराज उत्सवात सहभागी व्हावे.
कार्यक्रमाची रूपरेषा :
रविवार दिनांक १४/०५/२०२३
पहाटे ५.३० वा. श्री भैरवनाथ महाराज अभिषेक
दुपारी १२.०० वा. विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ यांचे भजन
सायं. ५.०० वा. पान सुपारी कार्यक्रम
रात्री ९.३० वा. श्री भैरवनाथ महाराज पालखी छबिना
रात्री ९.३० वा. शाहीर अमित शिंदे यांचे भारुड
स्थळ : श्री भैरवनाथ महाराज मंदिर, औंधगाव.
सोमवार दिनांक १५/०५/२०२३
सायं. ५.०० वा. जंगी कुस्ती आखाडा
स्थळ : इंदिरा गांधी शाळा मैदान, औंधगाव.
मंगळवार दिनांक १६/०५/२०२३
सायं. ७.०० वा. महिलांसाठी क्रांती नाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर
स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, औंधगाव.
वेळ
बुधवार दिनांक १७/०५/२०२३
सायं. ७.०० वा. गौतमी पाटील यांचा ऑक्रेस्ट्रा
स्थळ : इंदिरा गांधी शाळा मैदान, औंधगाव.
गुरुवार दिनांक १८/०५/२०२३
सायं. ६.०० वा. लहान मुलांसाठी बाल मेळावा
स्थळ : श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, औंधगाव.
निमंत्रक : औंध गाव विश्वस्त मंडळ
योगेश जुनवणे (अध्यक्ष), गिरीश जुनवणे (सचिव), हेरंब कलापुरे (खजिनदार) आणि विश्वस्त राहुल गायकवाड, महेंद्र जुनवणे, विकास गायकवाड, सागर गायकवाड, सुप्रिम चोंधे, विलास रानवडे, सुशिल लोणकर, सोपान राऊत
स्वागतोत्सुक :- औंधगाव विश्वस्त मंडळ, सल्लागार व समस्त ग्रामस्त औंधगाव.