बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा CBSE बोर्ड निकाल १००%

0
slider_4552

बालेवाडी :

बालेवाडी येथील सीएम इंटरनॅशनल स्कूलचा दहावी CBSE बोर्ड निकाल (2022-23) १००% लागला आहे.

याबद्दल माहिती देताना शाळेचे सचिव डॉ. सागर बालवडकर म्हणाले की “शांतपणे परिश्रम करा, तुमचे यश असो तुमचा आवाज.” सीएम इंटरनॅशनल स्कूलसाठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण 10वीच्या विद्यार्थ्यांनी CBSE परीक्षा 2022-23 मध्ये उत्कृष्ट शंभर टक्के निकाल मिळविला आहे. आमच्या २६ विद्यार्थ्यांना ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

शाळेच्या व्यवस्थापनाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानले; आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले

यशाची उंची गाठण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करणे गरजेचे असते. शाळेला हे जाहीर करताना आनंद होत आहे की
1. कु. चिन्मय मुदगलकर ९७.८% मिळवून अव्वल,
2. सोनाली जोशी ९७.६% मिळवून द्वितीय
3. कु. निखिल रायने 96.4% गुण मिळवून तृतीय स्थान पटकावले.

विषयनिहाय टॉपर्स आहेत –

इंग्रजी- अमन सावंत, शिवम माळगे, सोनाली जोशी – 98/100

गणित – चिन्मय मुदगलकर -100/100

विज्ञान – निखिल राय – 96/100

सामाजिक शास्त्र – चिन्मय मुदगलकर, तन्वी भोपले – 99/100

हिंदी – हर्षिता साहनी – 98/100

संस्कृत – सोनाली जोशी -100/100

मराठी – आदित्य गुर्जल – 95/100

जर्मन – तन्वी भोपले -94/100

संस्थापक अध्यक्ष श्री गणपतराव बालवडकर, सचिव डॉ.सागर बालवडकर आणि मुख्याध्यापिका कु.इक्बाल कौर राणा यांनी या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि या तरुणांची जिद्द व समर्पण खरोखरच वाखाणण्याजोगे असल्याचे नमूद केले.

 

See also  अपहरण केलेला मुलगा अखेर आठ दिवसांनी सापडला....! पोलिसांची शोध मोहिम यशस्वी....!