बालेवाडी :
श्री. म्हातोबा तु. बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,बालेवाडी पुणे.45 उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2023. एच्.एस.सी. (इ. 12 वी) कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल प्राप्त झाला असून विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे.
शाखेनुसार निकाल पुढिल प्रमाणे..
1) विज्ञान शाखा.शे.98.76
2) कला शाखा.शे.93.15
3) वाणिज्य शाखा.शे.98.80
एकूण निकाल शे.97.05
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनांचे संस्थापक-अध्यक्ष मा. गणपतराव बालवडकर, सचिव डाॅ.सागरदादा बालवडकर व प्राचार्य श्री.पोखरकर एस.वाय. यांनी विशेष अभिनंदन केले.
सचिव डाॅ.सागरदादा बालवडकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांना यश आले आहे. विद्यार्थी आणि त्यांना यश मिळावे म्हणून प्रयत्न करणारे सर्व शिक्षक यांच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश आले आहे. महाविद्यालयाची यशाची परंपरा राखत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून आम्हाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन.