शुभमन गीलचा शतकी तडका, गुजरात टायटनचा मुंबई इंडियनचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश..

0
slider_4552

अहमदाबाद :

आयपीएल अंतिम टप्प्यात आली असून आजच्या सेमी फायनल सामन्यांत गुजरात ने शुभमन गीलच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर मुंबई समोर मोठी धावसंख्या उभारत मुंबई इंडियन चा दणदणीत पराभव केला. गुजरातने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबईचा डाव अडखळत झाला. इशान किशन जखमी झाल्याने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून नेहल वढेरा रोहित शर्मासोबत मैदानात उतरला.

पहिल्याच षटकात नेहल वढेराच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर कॅमरून ग्रीन आला पण जखमी झाल्याने रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने डाव सावरण्याचा प्रयत्न सुरु केला. पण रोहित शर्मा 8 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची जोडी चांगली रंगली. पण ही जोडी फोडण्यात राशीद खानला यश आलं.

सूर्यकुमार याद 38 चेंडूत 61 धावा करून बाद झाला आणि मुंबईच्या विजयाचा आशा संपुष्टात आल्या. तो तंबूत परत नाही तोच विष्णु विनोद बाद होत परतला. त्यानंतर रांगच लागली. टिम डेविड, पियुष चावला, कुमार कार्तिकेय असे झटपट बाद झाले.

गुजरातचा डाव

गुजरातने प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. शुभमन गिलच्या आक्रमक खेळीपुढे एकाही गोलंदाजाची चालली नाही. वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने पहिल्या गड्यासाठी 54 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शुभमन गिलने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. 10 षटकार आमि 7 चौकारांच्या मदतीने शुभमन गिलने 129 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे गुजरातने मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्याने आक्रमक खेळी सुरुच ठेवली.

See also  मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याची क्रीडा क्षेत्रातील ओळख देशपातळीवर पोहोचविण्याची संधी : विभागीय आयुक्त सौरभ राव