संसद भवनाचे उदघाटन प्रसंगी ७५ रुपयांचे विशेष नाण्याचे अनावरण..

0
slider_4552

नवी दिल्ली :

संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ७५ रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे.केंद्र सरकार २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उदघाटन होणार आहे, या उद्घाटनासाठी ७५ रुपयांचे विशेष नाण्याचे अनावरण करणार असल्याचे, वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

वित्त मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनुसार हे नाणे ४४ मिलिमीटर व्यासासह एक गोलाकार आकार असेल आणि ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ५ टक्के निकेल, ५ टक्के जस्त – चतुर्थांश मिश्रधातूपासून बनविलेले असेल.

नाण्याची खासियत अशी आहे, नाण्याच्या मुखावर मध्यभागी अशोक स्तंभावरील सिंह असतील. खाली ‘सत्यमेव जयते’ कोरलेले असेल. देवनागरी लिपीतील ‘भारत’ शब्दासह डाव्या बाजूस आणि उजव्या परिघावर ‘ इंग्लिशमध्ये INDIA,’ अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे की, नाण्याची उलट बाजू संसदेच्या संकुलाची प्रतिमा दर्शवेल. ‘संसद संकुल’ हे शब्द देवनागरी लिपीत तर नाण्याच्या खालच्या परिघावर ‘संसद संकुल’ असे इंग्रजीत लिहिलेले असेल. भारत सरकारच्या कोलकाता टांकसाळीत हे नाणे काढले जात आहे.

A special coin of Rs 75 was unveiled on the occasion of the inauguration of the Parliament House.

New Delhi :

75 rupee coin to be issued on the occasion of the inauguration of the Parliament House. The central government will unveil a special coin of 75 rupees for the inauguration of the new Parliament House by Prime Minister Narendra Modi on May 28, said a notification issued by the Ministry of Finance.

According to a notification issued by the finance ministry, the coin will have a spherical shape with a diameter of 44 millimeters and will be made of a quarter alloy of 50 percent silver, 40 percent copper, 5 percent nickel, 5 percent zinc.

The special feature of the coin is that the face of the coin will have lions on the Ashoka pillar in the center. ‘Satyamev Jayate’ will be engraved below. With the word ‘Bharat’ in Devanagari script on the left side and ‘INDIA in English’ on the right periphery, the notification stated that the obverse side of the coin would feature an image of the Parliament complex. The words ‘Sansad Sankula’ will be written in Devanagari script and ‘Sansad Sankula’ will be written in English on the lower periphery of the coin. This coin is being minted at Kolkata Mint of Government of India.

See also  पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेत महाराष्ट्राने पटकाविला प्रथम क्रमांक