बालेवाडी :
श्री. म्हातोबा तु. बालवडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ,बालेवाडी पुणे ४५ माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च/एप्रिल २०२३. एस.एस.सी. (इ. १० वी) कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले.
यशवंत विद्यार्थी:
1) कु. समीक्षा निंबाळकर ~ ८८.८०%
2) कु. सृष्टी किरण धेंडे ~ ८८.६०%
3) कु. जागृती भास्कर जाधव ~ ८८.००%
3) कू. ओमकार रामकिसन गोरे ~ ८८.००%
एकूण निकाल शे.९६.८५%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनांचे संस्थापक-अध्यक्ष मा. गणपतराव बालवडकर, सचिव डाॅ.सागरदादा बालवडकर व प्राचार्य श्री.पोखरकर एस.वाय. यांनी विशेष अभिनंदन केले.
सचिव डाॅ.सागरदादा बालवडकर म्हणाले की, दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या टप्प्यामध्ये मिळवलेले यश अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. विद्यार्थ्यांनी अतिशय कठोर परिश्रम घेत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवत हा अवघड टप्पा पार केला. व शाळेची यशस्वी विद्यार्थी घडविण्याची परंपरा कायम राखली. त्याबद्दल शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक स्टाफचे मनापासून अभिनंदन करतो व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देतो.