माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा हरित उपक्रम..

0
slider_4552

सोमेश्वरवाडी :

पाषाण, औंध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील विविध सोसायट्यांसाठी माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा हरित उपक्रम 5 जून ते 15 जून दरम्यान राबविला जात आहे. हा अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम असुन नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

या उपक्रमाची माहिती देताना माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सांगितले की, सुंदर वसुंधरा ही आपल्या सगळ्यांना मिळालेली सर्वात सुंदर आणि सर्वोत्कृष्ट भेट आहे. मात्र आज जागतिक तापमान वाढीचे संकट, नष्ट होत चालेली नैसर्गिक साधनसंपत्ती रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याबरोबरच प्रदूषणमुक्त व हरित सृष्टीची निसर्गदत्त भेट आपण आपल्या भावी पिढीपर्यंत पोहचवणे आपले कर्तव्य आहे. आम्हाला सांगताना या गोष्टीचा आनंद होत आहे की, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ‘सोसायटी गार्डन संगोपन अभियान’ हा हरित उपक्रम राबवतोय. या उपक्रमांतर्गत झाडांचे चॉपिंग, ट्रीमिंग व कटिंग, कीड नियंत्रणासाठी जैविक फवारणी, झाडांना सेंद्रिय खतांचा डोस इ. पर्यावरण संवर्धनाची कामे पाषाण, औंध, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील विविध सोसायटी मध्ये मोफत करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे कार्य करत आहे.

या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपणही ही उपक्रमामध्ये सहभागी होवू शकता. तसेच आपल्याला ही कामे आपल्या सोसायटीमध्ये करून घ्यायची असल्यास कृपया 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सनी निम्हण यांनी केले आहे.

See also  पाषाण पम्पिंग स्टेशन टाकीवरून लाखो लिटर पाणी गळती...! पाणी गळतीमुळे बाणेर बालेवाडी पाणीटंचाई.