औंध येथील घरफोडी करून पसार झालेल्या मुख्य गुन्हेगाराला अटक.

0
slider_4552

पुणे :

औंध परिसरात घरफोडी करून पोलिसांसमोरूनच पसार झालेल्या चारपैकी एक मुख्य गुन्हेगाराला पकडण्यास चतुर्श्रुंगी पोलिसांना यश आले आहे. हडपसर परीसरात रामटेकडी येथील जंगलात पाठलाग करीत हडपसर आणि चतुश्रृंगी पोलिस ठाण्यातील १३ पोलीस कर्मचारी व २ अधिकारी व हडपसर पोलीस स्टेशनचे २ पोलीस कर्मचारी यांनी मोठ्या धाडसाने त्याला पकडले. चोरट्याकडे ब्लेड आणि धारदार शस्त्र असतानाही जिवाची पर्वा न करता पोलिसांनी त्याला अटक केली.

बिरजूसिंग टाक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहरातील विविध पोलिस ठाण्यात त्यावर घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीचे सुमारे १०० गुन्हे दाखल आहेत. आरोपी हे शिकलगरी असल्याचे संशय बळावलेने शिकलगरी टोळीचे या पुर्वीचे फुटेज व आत्ताचे पुटेज तपासून सदर गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी, सनीसिंग पाप्पासिंग दुधानी, बिर्सिग शामसिंग कल्याणी, लखीसिंग गब्बरसिंग टाक सर्व राहणार रामटेकडी, हडपसर, पुणे यांनी केल्याची गोपनीय माहिती मिळाली.

नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे पंकन देशमुख, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर , सहा पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांना देवून त्यानी केलेल्या सुचना प्रमाणे अनिल शेवाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्ने यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, मोहन जाधव, अमलदार दिनेश गडाकुश, मुकूद तारू, प्रकाश आव्हाड, श्रीकांत वाचवले, संतोष जाधव, मारम साळवी, प्रमोद शिंदे, आशिष निमसे, जानेचर मुळे, मारुती पारधी, वसिम सिद्दीकी, नेजस चोपडे, अमोल जगताप यांची टिम तयार करून आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेत होते.

दि. ०२/०१/२०२१ रोजी गोपनीय बातमीदाराकडुन खबर मिळाल्या नंतर, पोलिस अधिकारी व अमंलदार यांच्या दोन टिम तयार करून मदतीकरिता हडपसर पो.स्टेकडील अमलदार धुमाळ व शेख यांना घेवून सदर आरोपीना रामटेकडी येथे घेराव घातला असता आरोपीने बिरजुसिंग रजपुतसिंग दुधानी, याने त्याचेकडील रेम्बो चाकू ( खंजीर ) याने पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांचेवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला मात्र त्यांनी प्रसंगावधान राखुन तो वार वाचविला.

See also  जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

तसेच इतर तिन इसमांनी त्यांचेकडील शस्त्रे अंगावर उगारून दरीमध्ये उडी टाकून पळून गेले व तसेच आरोपी बिरजूसिंग रजपुतसिंग दुधाणी, वय ३७ वर्षे, रा रामटेकडी अंध शाळेच्या मागे, हडपसर, पुणे यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, अटक टाळणे करिता त्याचे जवळील ब्लेडने स्वतःचे पाटीवर व हातावर ब्लेडने वार करून स्वतःस जखमी करून घेतले व पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांना सदर आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी आरोपीविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे तक्रार देवुन वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस उपचार करून गुन्हयात अटक केली आहे. गुन्हयात वापरलेली सॅन्ट्रो कार काळे रंगाची नं . MH.14.AM.5336 ही जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडून गुन्हयात वापरलेला रेम्बो चाकू ( खजीर ) व ब्लेड जप्त करण्यात आले आहे.

घरफोडी व जबर चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक महेश भोसले हे करीत आहेत. सदर कारवाई ही मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता. सह पोलीस आयुक्त डॉ रविंद्र शिसवे यांचे आदेशान्वये अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पश्चिम प्रादेशीक विभाग तसेच पोलीस उप – आयुक्त गुन्हे. परिमंडळ ४ व सहा पोलीस आयुक्त -०१, सहा. पोलीस आयुक्त, चतु श्रृंगी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली चतु श्रृंगी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे व स्टाफ व गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी य स्टाफ यानी केली आहे.