मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचे आश्वासन.
औंध :
पुणे शहराच्या प्रवेशद्वार असणाऱ्या बोपोडी येथे जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक कोंडी नित्याचीच झाली असून या रस्त्याचे रुंदीकरण शासकीय उदासीनतेमुळे लांबले होते. या प्रश्नावर कायम गेली चार वर्षे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका व रिपाई गटनेत्या सुनिता परशुराम वाडेकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या बोपोडी येथील पाहणी दौऱ्यावेळी आपले मत व्यक्त केले.
यावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले की, भूसंपादनाची 33 कोटी रुपयांची रक्कम भुमी संपादन खात्याला देण्याची राहिली असुन ती लवकरात लवकर देण्याचे आदेश काढण्यात येतील, व रुंदीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल.तसेच बोपोडीच्या पाणीप्रश्नाबाबत नव्या टाकीचे काम चिखलवाडी येथे संरक्षण खात्याच्या आडकाठीमुळे थांबले असुन त्याबाबत शासनस्तरावर पत्रव्यवहार चालू आहे व लवकरच हा प्रश्न सुटेल.
यावेळी रिपाई नेते परशुराम वाडेकर नगरसेविका सुनिता परशुराम वाडेकर, अविनाश कदम, आण्णा आठवले विजय ढोणे, राजेंद्र शिंदे, निलेश वाघमारे, विशाल कांबळेे, आप्पासाहेब वाडेकर, बबन बोडरे रिपाईं कार्यकर्ते व परिसरातील नागरीक उपस्थित होते.